अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- अमेरिकी फेडरल बँकेचे व्याजदरबाबतचे धोरण तसेच रशिया आणि युक्रेनमधील राजकीय तणावामुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
याचेच पडसाद भारतीय बाजारपेठेवर देखील पडले आहे. भारतीय शेअर बाजाराचे दोन्ही प्रमुख निर्देशांक म्हणजे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही चांगलेच गडगडले.
मात्र कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मात्र निर्देशांकांनी जोरदार झेप घेतली. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कोणते आहेत हे शेअर्स जाणून घेऊ या …
अॅक्सिस बँक : हा शेअर गेल्या 200 दिवसांपासून 737 रुपयांच्या वरच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तुम्ही 773.85 रुपयांच्या पातळीवर खरेदी केल्यास पुढील काही दिवसांत 867-893 रुपयांचं लक्ष्य गाठता येईल. घसरण झाली तरी शेअरचा भाव 705 रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता नाही.
मारुती सुझुकी : हा शेअर सध्या 9,500 रुपयांपर्यंत सहज पोहोचण्याची शक्यता असून, 8 हजार 820.20 रुपयांच्या पातळीवर हा शेअर खरेदी केल्यास चांगला नफा मिळेल. 9,500 रुपयांच्या पातळीला स्पर्श केल्यानंतर, यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून तो 9,950 रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.घसरण झाली तरी हा शेअर 8,350 रुपयांच्या खाली जाणार नाही.
एसबीआय स्टेट बँकेचा शेअर सध्या 528.95 रुपयांच्या किंमतीला देखील तो विकत घेतला तरी नजीकच्या काळात तो 580 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. यात घसरण झाली तरी भाव 501 पेक्षा कमी होणार नाहीत.