FD Rate : रिजर्व्ह बँकेने नुकतेच रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. परंतु, याचा फायदा आता ग्राहकांना होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसा फायदा होणार?
तर रेपो रेट वाढताच खाजगी क्षेत्रातील धनलक्ष्मी बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्याकडे ही कमाईची सुवर्णसंधी आहे.
आपल्या ग्राहकांसाठी ही बँक आता 7 ते 45 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 3.25 टक्के इतके व्याज देत आहे. 45-90 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 3.75 टक्के व्याजदर देत आहे. तर 91 दिवस ते एका वर्षात परिपक्व होणाऱ्या FD वर 4.50 टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर एक वर्ष ते 2 वर्षांच्या FD वर 6.35% व्याज देत आहे.
555 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ही बँक 7.25 % इतके व्याज देत आहे. त्याशिवाय दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6 टक्के व्याज देत असून 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 6.10 टक्के व्याज देत आहे.
तर 1,111 दिवसांच्या FD वर बँक 6.25 टक्के व्याज देत आहे. त्याशिवाय ही बँक आपल्या ग्राहकांना 5 वर्षांपेक्षा जास्त परंतु 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.10 टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देत आहे असे बँकेने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे.
FY23 मध्ये बँक 15.17 टक्क्यांनी वाढून 21,857 कोटी रुपये झाली, तर ठेवी 6.96 टक्क्यांनी वाढून 12,748 कोटी रुपये झाले आहे. या वर्षी बँकेने सप्टेंबर तिमाहीत नोंदवले की त्यांच्याकडे 520 पेक्षा जास्त ग्राहक टचपॉइंट आहेत. या बँकेच्या 247 शाखा, 263 एटीएम आणि 17 बीसी आहेत.