ताज्या बातम्या

Top interest on RD to senior citizens : पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! ‘या’ बँका ज्येष्ठ नागरिकांना देत आहेत आरडीवर सर्वात जास्त व्याज

Top interest on RD to senior citizens : अनेकांना एफडीमधील गुंतवणूक परवडत नाहीत. अशातच अनेक बँकांनी काही दिवसांपूर्वी आरडीवर मिळणाऱ्या व्याजदरात कमालीची वाढ केली आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्ही आरडीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण आता एसबीआय, पोस्ट ऑफिस पंजाब नॅशनल बँक आणि HDFC बँकेच्या आरडीवर सर्वात जास्त व्याज मिळत आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे वाढत्या महागाईच्या काळात पैसे कमावण्याची सुवर्णसंधी आहे.या बँका आरडीवर किती व्याज मिळत आहे जाणून घ्या.

जाणून घ्या एसबीआय RD वर मिळणारे व्याज

एसबीआय RD खात्यांमध्ये किमान 100 रुपये आणि त्यानंतर 10 रुपयांच्या पटीत ठेवण्याची परवानगी देत आहे. हे लक्षात घ्या की बँक ग्राहकांसाठीचे आरडी व्याजदर हे बँकेकडून सामान्य जनता आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑफर केलेल्या एफडी दरांसारखेच आहेत. ज्येष्ठ नागरिक 5 ते 10 वर्षांच्या आरडीमध्ये 7.5% पर्यंत व्याज मिळवू शकतात. तर हाच दर 2 ते 3 वर्षांच्या RD साठी लागू असून बँक 1 ते 2 वर्षांच्या RD वर 7.3% व्याज देत आहे.

जाणून घ्या पोस्ट ऑफिस RD व्याज

पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग्ज आरडी खात्यात किमान 100 रुपये आणि त्यानंतर 10 रुपयांच्या पटीत ठेवण्याची परवानगी देत आहे. नवीन वर्षात म्हणजे 1 जानेवारी, 2023 पासून पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी RD व्याज दर 5.8% (त्रैमासिक चक्रवाढ) इतकी आहे. पोस्ट ऑफिस आरडी खाते हे खाते उघडण्याच्या तारखेपासून 5 वर्षांनी परिपक्व होते हे लक्षात ठेवा.

जाणून घ्या पंजाब नॅशनल बँकेच्या आरडी व्याज

तुम्ही PNB मध्ये 6 महिने ते 120 महिन्यांच्या कालावधीसाठी RD खाते उघडू शकता. बँक RD मध्ये रु. 100 च्या पटीत ठेव करण्यास परवानगी देते. बँक ग्राहकांसाठी RD व्याजदर हे बँकेने सार्वजनिक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑफर केलेल्या FD दरांसारखेच आहे. ज्येष्ठ नागरिक 2 ते 3 वर्षांसाठी RD वर 7.55% पर्यंत व्याज मिळवू शकतात. तर बँक ५ ते १० वर्षांच्या आरडीवर आता ७.३५ टक्के इतके व्याज देत आहे.

जाणून घ्या HDFC बँक RD व्याज

HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांना 90 महिने आणि 120 महिन्यांच्या RD वर 7.75% व्याज दर देत आहे. ही बँक 24 महिने, 27 महिने, 36 महिने, 29 महिने, 48 महिने आणि 60 महिन्यांच्या ठेवींसाठी RD खात्यांवर 7.5% इतके व्याज देत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts