Gold Price Update : खरेदीदारांसाठी गुडन्यूज, सोन्याच्या किमती पुन्हा घसरल्या

Gold Price Update : सतत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल होत असतो. अशातच आजपासून नवीन व्यावसायिक आठवड्याला सुरुवात होत आहे. दरम्यान शेवटच्या व्यापारी आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरातही वाढ झाली होती. त्यामुळे आज सगळ्यांचे सोने आणि चांदी स्वस्त होणार का याकडे लक्ष लागले आहे.

जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण मागच्या काही आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर

आज जाहीर होणार नवीन दर

आजपासून नवीन व्यावसायिक आठवड्याला सुरुवात होत आहे. मात्र शेवटच्या व्यापारी आठवड्यात सराफा बाजारात सोन्यासोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली होती. आज नवीन व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीची वाटचाल कशी होते याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

असा होता शुक्रवारी सोने आणि चांदीचा दर

मागच्या आठवड्यातील पाचव्या आणि शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी सोने प्रति 10 ग्रॅम 1099 रुपयांनी स्वस्त झाले असून 57788 रुपये प्रति किलोवर बंद झाले. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 972 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढून 58882 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला आहे.

केवळ सोने नाही तर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 2037 रुपयांच्या वाढीसह 69539 रुपये प्रति किलोवर बंद झाला. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर 2231 रुपयांनी वधारून 71576 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे.

जाणून घ्या नवीनतम 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर

24 कॅरेट सोने 1094 रुपयांनी स्वस्त होऊन 57788 रुपयांवर, 23 कॅरेट सोने 1089 रुपयांनी स्वस्त होऊन 57557 रुपयांवर, 22 कॅरेट सोने 1002 रुपयांनी स्वस्त होऊन 52934 रुपयांवर, 18 कॅरेट सोने 820 रुपयांनी स्वस्त होऊन 43341 रुपयांवर आहे. 14 कॅरेट सोने 640 रुपयांनी स्वस्त झाले असून, 33806 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार होत आहे.

सोने 1000 रुपयांनी तर चांदी 10400 रुपयांनी स्वस्त

सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 1094 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झालेली आहे. या पूर्वी मागच्या वर्षी म्हणजेच 2 फेब्रुवारी 2022 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला असून तेव्हा सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. तर चांदी अजूनही त्याच्या उच्च पातळीपेक्षा 10441 रुपये प्रति किलो दराने स्वस्त असून चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.

सर्वात शुद्ध सोने

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जात आहे. खूप मऊ असल्यामुळे या सोन्यापासून दागिने बनवता येत नाहीत. दागिने बनवायचे असेल तर बहुतेक 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. तसेच 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने बनवण्यात येतात. 24 कॅरेट सोने चमकदार असते, परंतु त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे अनेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts