ताज्या बातम्या

महिन्याच्या सुरुवातीलाच टाटा मोटर्सकडून ग्राहकांना खुशखबर ! या वाहनांवर मिळत आहे प्रचंड सूट !

Tata Motors Discount : जून महिन्यात बऱ्याच गाड्यांवर डिस्काउंट देण्यात आला होता, आता ऑगस्ट महिना सुरु असून महिन्याच्या सुरुवातीलाच टाटा मोटर्स त्यांच्या अनेक वाहनांवर डिस्काउंट घोषित केला आहे. या गाड्यांवर सध्या उत्तम सूट मिळत आहे. अशातच तुम्ही घेण्याची योजना आखत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.

कंपनीने आपल्या EV श्रेणीतील कार आणि SUV दोन्हीवर 80,000 रुपयांपर्यंत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासह, कंपनीने कार खरेदी करणे सोपे करण्यासाठी अनेक बँकांशी भागीदारी देखील केली आहे, ज्याच्या मदतीने कंपनी तुम्हाला 100% ऑन-रोड फायनान्स सुविधा प्रदान करत आहे. चला कोणत्या गाड्यांवर किती सूट मिळत आहे, ते पाहूया.

Tata Tiago

तुमच्या माहितीसाठी टाटा टियागो कंपनीच्या सर्वोत्तम वाहनांपैकी एक मानली जाते. Tata Tiago वर कंपनी 50,000 रुपयांपर्यंत सूट ऑफर करत आहे. यामध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस किंवा इतर प्रमोशनल ऑफर देखील उपलब्ध आहेत. तुम्ही सध्या ही गाडी घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

Tata Tigor

कंपनी आपल्या टिगोरवरही एक उत्तम डिस्काउंट ऑफर देत आहे. कंपनी या कारवर 50 हजार रुपयांची सूट देत आहे. टियागोप्रमाणेच कंपनी टिगोरचीही जास्तीत जास्त विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे दर महिन्याला या कारवर अनेक मोठ्या सवलती दिल्या जात आहेत. ही कार उत्तम फीचर्ससह मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही पहिल्यांदा कार घेण्याची योजना आखत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम असेल.

Tata Tigor EV

कंपनी टाटा मोटर्सची लोकप्रिय इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV वर 80 हजार रुपयांची ऑफर देत आहे. ज्यांना इलेक्ट्रिक कार घ्यायची आहे त्यांच्यासाठी ही ऑफर महत्त्वाची ठरणार आहे. सध्या तुमची इलेक्ट्रिक गाडी घेण्याची योजना असेल तर ही संधी चुकवू नका, कारण ही ऑफर तुमच्यासाठी एकदम उत्तम आहे.

Tata Altroz

कंपनी Tata Altroz ​​वर सुमारे 40,000 रुपयांची सवलत ऑफर देखील देत आहे. या कारमध्ये कंपनीने अनेक उत्कृष्ट फीचर्स आणि पॉवरफुल इंजिन देखील दिले आहे. एवढेच नाही तर नुकतीच ही कार सीएनजी अवतारातही लॉन्च करण्यात आली आहे ज्याला अधिक बूट स्पेसही मिळते. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही टाटा मोटर्सची नवीन कार घ्यायची असेल, तर ही वाहने तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar
Tags: Tata Motors

Recent Posts