ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कृषी उपकरण खरेदी करण्यासाठी माय-बाप सरकार देणार आत्ता 80 टक्क्यांपर्यंत अनुदान; वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Government Scheme :-  बळीराजा हा जगाचा पालन पोषण करणारा पालनकरता आहे तर आपल्या देशाचा बळीराजा कणा आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था हि शेती क्षेत्रावर (Farming Sector) अवलंबून आहे.

यामुळे शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार दरबारी अनेक उपाययोजना कार्यान्वित केल्या जातात तसेच अनेक उपाययोजना विचाराधीन असतात.

शेतकऱ्यांचे (Farmers) जीवनमान उंचावण्यासाठी, शेतीतून चांगले उत्पादन प्राप्त व्हावे यासाठी शासन (Government) नेहमीच शेतकरी हिताच्या योजना राबवित असते.

या योजना (Government Scheme) कार्यान्वित करण्यामागचा हेतू म्हणजे शेतकरी राजाला आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देणे हा असतो.

जेव्हा बळीराजा आर्थिक दृष्टीने मजबूत बनेल तेव्हाच आपल्या देशाचा जीडीपी (GDP) वाढेल, यामुळेच शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन दरबारी अनेक योजना राबविल्या जात असतात.

मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान सम्मान निधि योजनेसारखी महत्त्वाकांक्षी योजना राबवून दाखवली आहे.

देशातील केंद्र सरकार तसेच अनेक राज्य सरकारे शेतकऱ्यांसाठी कमी दरात खतांची, बियाण्यांची, कृषी उपकरणांची उपलब्धता करून देतात.

शेतकऱ्यांना आता कृषी उपकरणांवर तब्बल 50 ते 80 टक्के अनुदान (Subsidy For Agriculture Machinery) उपलब्ध करून दिले जाणार आहे.

यामुळे देशातील शेतकरी बांधवांना मोठा फायदा होणार आहे. कृषी उपकरणांवर अनुदान मिळत असल्याने आता शेतकऱ्यांना शेती करणे अजूनच सोपे होणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी कपात होणार असून त्यांचे श्रम वाचणार आहे शिवाय उत्पन्नदेखील भरघोस मिळणार आहे.

कृषी उपकरणांवर स्माम या योजनेद्वारे शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. ज्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना काही कागदपत्रांची पूर्तता देखील करावी लागणार आहे यामध्ये,आधार कार्ड, वास्तव्याचे प्रमाणपत्र, सातबारा उतारा,बँक पासबुक,मोबाइल क्रमांक, जातीचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो याचा समावेश आहे.

या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे देशातील कोणताही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. बाजारपेठेत कृषी उपकरणांना असलेला दर गृहीत धरून शेतकरी बांधवांना 50 ते 80 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना https://agrimachinery.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. वेबसाईट वर गेल्यानंतर फार्मर्स या पर्यायावर जाऊन शेतकरी बांधवांना नोंदणी करावी लागणार आहे.

यामध्ये आपणास आपला वैयक्तिक तपशील आधार क्रमांक इत्यादी बाबी प्रविष्ट कराव्या लागणार आहेत. या वेबसाईटवर अर्ज भरल्यानंतर आपणास तो सबमिट करावा लागणार आहे. एवढे केल्यानंतर सदर शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts