iPhone Offer : स्वस्तात आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. कंपनीच्या iPhone 11 या मॉडेलवर आतापर्यंतची खूप मोठी सवलत मिळत आहे. हे लक्षात घ्या की कंपनीचे हे 2019 चे मॉडेल आहे. सर्वात जास्त विक्री होणारे हे एक मॉडेल आहे.
कंपनीचा हा फ्लॅगशिप फोन असून त्याला पूर्वी खूप मागणी होती. यावर वेगवेगळ्या ऑफर मिळत आहे. ऑफरमुळे हा फोन तुम्ही आता 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला फ्लिपकार्टवर जावे लागणार आहे.
फ्लिपकार्टवर खरेदी करता येणार
iPhone 11 (64GB) ची किंमत 43,900 रुपये इतकी आहे. हा फोन जर तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर फ्लिपकार्टवर 2,901 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध घेता येणार आहे. म्हणजेच, तुम्ही कोणत्याही कार्ड डिस्काउंट आणि एक्सचेंज इन्सेंटिव्हशिवाय 40,999 रुपयांमध्ये सहज फोन खरेदी करू शकता. बँक आणि एक्सचेंज ऑफरच्या मदतीने फोनची किंमत खूप कमी केली जाऊ शकते.
मिळत आहे बँक ऑफर
Axis Bank, HSBC, IndusInd Bank किंवा One Card ने जारी केलेले क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही या फोनवर 1,000 रुपये वाचवू शकता. त्यानंतर फोनची किंमत 39,999 रुपये इतकी असू शकते. तसेच फ्लिपकार्ट आता आपल्या जुन्या स्मार्टफोनवर आपल्या नवीन एक्सचेंज ऑफरद्वारे 20,000 रुपयांपर्यंत सवलत देत आहे.
हे लक्षात घ्या की तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला इतकी सवलत मिळू शकते. तुम्ही पूर्ण ऑफ मिळवण्यात व्यवस्थापित केली तर या फोनची किंमत 19,999 रुपये असणार आहे.
असे असणार स्पेसिफिकेशन
कंपनीच्या हा फोनमध्ये 6.1-इंचाचा Liquid Retina HD डिस्प्ले दिला आहे. हा फोन A13 बायोनिक चिपसेटद्वारे समर्थित असून यात 12MP रियर कॅमेरा आणि 12MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे.