ताज्या बातम्या

Nitin Gadkari : वाहनचालकांसाठी खुशखबर, नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी वाहनचालकांसाठी खूशखबर दिली आहे. टोल प्लाझावर गर्दी कमी करण्यासाठी आणि वाहन मालकांकडून सोयीस्कर पद्धतीने पैसे गोळा करण्यासाठी सरकार स्वयंचलित नंबर प्लेट ओळख प्रणालीवर (automatic number plate identification system) काम करत आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari) यांनी सोमवारी सांगितले की, सरकार यासाठी पथदर्शी प्रकल्पावर देखील काम करत आहे, ज्याद्वारे टोल महामार्गांवर चालणाऱ्या वाहनांपासून नेमके अंतर लक्षात घेऊन पैसे आकारले जातील.

गडकरी एका कार्यक्रमात म्हणाले की, सरकारला भारताची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इलेक्ट्रिकवर आधारित करायची आहे. “रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वाहने न थांबवता स्वयंचलित टोल वसुली करण्यासाठी स्वयंचलित नंबर प्लेट ओळख प्रणालीच्या पायलट प्रकल्पावर काम करत आहे,” असं ते म्हणाले.

“या नवीन तंत्रज्ञानासह, आम्हाला दोन उद्दिष्टे साध्य करायची आहेत – टोल बूथवर वाहतुकीची हालचाल आणि उपयोग नुसार पैसे देणे,”असं ते अधिक तपशील न सांगता म्हणाले.

2018-19 मध्ये टोल प्लाझावर वाहनांची सरासरी प्रतीक्षा वेळ आठ मिनिटे होती. FASTag लागू झाल्यानंतर, 2020-21 आणि 2021-22 मध्ये वाहनांसाठी सरासरी प्रतीक्षा वेळ 47 सेकंदांवर आला आहे. तथापि, शहरांजवळ आणि दाट लोकवस्तीच्या भागात टोल प्लाझावर पीक अवर्समध्ये अजूनही काही विलंब होतो.

गडकरी म्हणाले की, सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी सर्व नवीन राष्ट्रीय महामार्ग आणि सध्याच्या ‘फोर प्लस लेन’ राष्ट्रीय महामार्गांवर प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (ATMS) बसवली जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts