ताज्या बातम्या

Nothing Phone (1) 5G : नथिंग फोन (1) वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! फोनमध्ये सुरू झाले जिओ 5G साठी नवीन अपडेट……

Nothing Phone (1) 5G : दिवाळीपूर्वी नथिंग फोन (1) (Nothing Phone (1)) युजर्सना आनंदाची बातमी मिळाली आहे. या फोनसाठी एक नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे. यासह, रिलायन्स जिओ ट्रू 5G सपोर्ट (Jio True 5G Support) नथिंग फोन (1) मध्ये सुरू होईल. म्हणजेच, या अपडेटनंतर पात्र वापरकर्ते रिलायन्स जिओ 5G सेवा (Reliance Jio 5G Services) वापरू शकतात.

यासह एअरटेल (airtel) ने 5G रेडी डिव्हाईस लिस्टमध्ये नथिंग फोन (1) आधीच जोडला आहे. नवीन ओव्हर-द-एअर (over-the-air) किंवा OTA अपडेट निवडलेल्या डिव्हाइस मालकांसाठी रोल आउट होत आहे. इतर युजर्सनाही लवकरच हे अपडेट मिळणे सुरू होईल.

Reliance Jio 5G आता निवडक शहरांमध्ये उपलब्ध आहे –

रिलायन्स जिओ सध्या चार शहरांमध्ये 5G सेवेची चाचणी करत आहे. त्याची सेवा चाचणीही दिल्लीत होत आहे. निवडक वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा मिळत आहे. नथिंग फोन (1) वापरकर्त्यांसाठी आवृत्ती 1.1.5 जारी केली जात आहे.

MySmartprice ने याबाबत माहिती दिली आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, हे अपडेट सध्या फक्त 10 टक्के डिव्हाइस मालकांसाठी जारी केले जात आहे. उर्वरित उपकरणांना दिवाळीपूर्वी त्याचे अपडेट मिळेल.

म्हणजेच यूजर्सला जास्त वाट पाहावी लागणार नाही. चेंजलॉगनुसार, हे अगदी किरकोळ अपडेट (minor update) आहे. हे फक्त रिलायन्स जिओ वापरकर्त्यांसाठी 5G सक्षम करते. या अपडेटचा आकार फक्त 22MB आहे. तुमच्या माहितीसाठी Samsung, Apple, Xiaomi आणि Google ने अद्याप 5G सपोर्टसाठी रोलआउट जारी केलेले नाही.

यामुळे, 5G सपोर्ट सध्या बहुतांश उपकरणांवर उपलब्ध नाही. नथिंग फोन (1) या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आला होता. याच्या मागील बाजूस युनिक डिझाइन देण्यात आले आहे. हे उपकरण n1, n3, n5, n7, n8, n20, n28, n38, n40, n41, n77 आणि n78 बँडना सपोर्ट करते.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts