Pension : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) पेन्शनधारक (pensioners) त्यांच्या पेन्शनशी (pension) संबंधित सर्व माहिती आता घरात बसून फक्त एका क्लीकवर आरामात मिळू शकते.
यासाठी एसबीआयच्या ‘पेन्शन सेवा’ (Pension Seva) वेबसाइटवर (website) लॉग इन करू शकता. पेन्शनशी संबंधित प्रत्येक माहिती या वेबसाइटवरून घेता येईल.
SBI चे सुमारे 54 लाख पेन्शनधारक आता घरबसल्या ऑनलाइन पेन्शन प्रोफाइल आणि व्यवहार तपशीलांसह विविध प्रकारची माहिती मिळवू शकतात. यासाठी वेगळे शुल्क आकारले जात नाही. SBI च्या या वेबसाईटचे नाव ‘SBI पेंशन सर्विस’ (SBI Pension Service
) आहे.ही माहिती ऑनलाइन मिळेल
एसबीआयच्या या वेबसाइटद्वारे, पेन्शनधारक गणना पत्रके, पेन्शन स्लिप आणि फॉर्म 16 डाउनलोड करू शकतात. ते पेन्शन प्रोफाइल तपशीलांसह गुंतवणूक संबंधित तपशील देखील काढू शकतात.
याशिवाय वेबसाइटच्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्राची स्थिती देखील जाणून घेता येते. यातून व्यवहाराचा तपशीलही काढता येतो. पेन्शन सेवा वेबसाइटचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला प्रथम त्यावर स्वतःची नोंदणी करावी लागेल. यासाठी https://www.pensionseva.sbi/ वर जावे लागेल. येथे, वरच्या बाजूला असलेल्या नोंदणी टॅबवर क्लिक करून, किमान 5 वर्णांचा वापरकर्ता आयडी तयार करावा लागेल.
खाते कसे सक्रिय केले जाईल
वापरकर्ता आयडी तयार केल्यानंतर, तुम्हाला तुमचा पेन्शन खाते क्रमांक, जन्मतारीख, बँक शाखा कोड आणि शाखेत नोंदणीकृत तुमचा ईमेल आयडी प्रविष्ट करावा लागेल.
त्यानंतर नवीन पासवर्ड टाका आणि त्याची पुष्टी करा. काही प्रश्न असतील ज्यामध्ये दोन प्रोफाइल प्रश्न निवडा आणि त्यांची उत्तरे द्या आणि पुढील संदर्भासाठी जतन करा. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, पेन्शनधारकाच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर एक मेल पाठविला जाईल. त्यात खाते सक्रिय करण्यासाठी लिंक असेल.
खाते सक्रिय झाल्यानंतर, वापरकर्ते नोंदणीकृत आयडी आणि पासवर्डसह वेबसाइटवर लॉग इन करून पेन्शन संबंधित माहिती मिळवू शकतात.
ऑनलाइन खाते उघडण्याची
सुविधा स्टेट बँक ऑफ इंडियाने इन्स्टा सेव्हिंग बँक खाते पुन्हा सुरू केले आहे. Insta Saving Account हे घरबसल्या ऑनलाईन उघडता येते. यासाठी बँकेत जाऊन कोणत्याही प्रकारची कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही.
हे खाते उघडण्यासाठी SBI चे YONO अॅप डाउनलोड करावे लागेल. यानंतर या अॅपमध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांकाची माहिती द्यावी लागेल. YONO अॅपवर ही माहिती टाकल्यानंतर, इंस्टा डिजिटल बचत बँक खाते उघडले जाईल.