SBI new MCLR Rate : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. या बँकेने आपल्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे.
कारण बँकेने MCLR मध्ये 10 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आता बँकेच्या एका ऑफेरमुळे 31 जानेवारीपर्यंत तुम्ही गृहकर्जावर सूट मिळवू शकता.
महगणार सर्व कर्जे
SBI च्या या निर्णयानंतर आता घर, कार आणि पर्सनल लोन ग्राहकांच्या EMI मध्ये कमालीची वाढ होणार आहे. त्यामुळे आता व्याज पूर्वीपेक्षा जास्त असल्यामुळे इथून पुढे नवीन घर, कार किंवा वैयक्तिक कर्ज घेणे महाग होणार आहे. हे नवीन व्याजदर आजपासून म्हणजे 15 जानेवारीपासून लागू झाले आहेत.
असे आहेत नवीन दर
नवीन दरानुसार, आता एक वर्षाचा MCLR आता 8.30 टक्क्यांवरून 8.40 टक्के इतका झाला आहे. इतर सर्व मुदतीच्या कर्जासाठी MCLR मध्ये कोणताच बदल झाला नाही.
असा आहे MCLR दर
SBI च्या MCLR मध्ये ओवरनाइट MCLR 7.85% आहे. एक महिना आणि तीन महिन्यांसाठी MCLR 8.00% आहे. सहा महिने आणि एक वर्षासाठी MCLR 8.05% आहे. पुनरावृत्तीनंतर, MCLR दोन वर्षांसाठी 8.25% वरून 8.50% पर्यंत वाढवला आहे. तीन वर्षांसाठी MCLR 8.35% वरून 8.60% केला आहे.
रेपो रेटमध्ये वाढ
RBI च्या रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.35 टक्क्यांनी वाढ केल्यामुळे हा दर 6.25% इतका झाला आहे. यानंतर बहुतांश बँकांनी MCLR मध्ये वाढ केली आहे. मे महिन्यात 40 बेसिस पॉइंट्स, जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रत्येकी 50 बेसिस पॉइंट्स.
मागीलआठवड्यात आरबीआयने रेपो दरात सुमारे 0.35 टक्क्यांनी वाढ केली आहे. दरम्यान आतापर्यंतची ही पाचव्यांदा वाढ केली आहे. मे 2022 पासून आरबीआयने 2.25 टक्के वाढ केली आहे. आता या नव्या वाढीनंतर बँकांना RBI कडून 6% पेक्षा जास्त व्याजाने कर्ज मिळणार आहे.