Good News : दिवाळी (Diwali) अगदी तोंडावर आली असून या मुहूर्तावर अनेकजण वाहने तसेच घराचे भूमिपूजन करत असतात, अशा सर्वांसाठी आनंदाची बातमी असून देशांतर्गत बाजारात (Market) गेल्या सहा महिन्यांत स्टीलच्या किमती जवळपास 40 टक्क्यांनी घसरून 57,000 रुपये प्रति टन झाल्या आहेत.
यामुळे रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा आणि बांधकाम, वाहने आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती कमी होऊ शकतात. स्टीलमिंट, लोह आणि पोलाद (Steelmint, iron and steel) उद्योगाशी संबंधित किमतींसह माहिती पुरवणाऱ्या कंपनीने सांगितले की, 15 टक्के निर्यात शुल्क लागू केल्यामुळे निर्यात कमी झाल्यामुळे किमतीत घसरण झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, हॉट रोल्ड कॉइल (HRC) च्या किमतीत वाढ झाली.
जीएसटीसह किंमत 93,000 रुपये प्रति टन करण्यात आली
स्टीलमिंटच्या म्हणण्यानुसार, वाढत्या HRC किमती हे वापरकर्त्यांच्या उद्योगांसाठी चिंतेचे कारण होते, कारण देशांतर्गत बाजारात स्टीलच्या किमती (Steel prices) एप्रिल, 2022 मध्ये प्रति टन 78,800 रुपयांवर पोहोचल्या होत्या. त्याच वेळी, 18 टक्के जीएसटीनंतर, किंमत सुमारे 93,000 रुपये प्रति टन झाली होती.
स्टीलच्या किमतीत 40 टक्के घसरण असामान्य नाही
श्याम स्टीलचे संचालक ललित बेरीवाला म्हणाले की, स्टीलच्या किमतीत 40 टक्क्यांनी घट होणे असामान्य नाही, कारण स्टीलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
ते म्हणाले की, किमती कमी झाल्यामुळे रिअल इस्टेट, वाहने, इन्फा (Real Estate, Vehicles, Info) यासह टिकाऊ ग्राहक उत्पादनांवर पडणे निश्चित आहे, ज्याचा अंतिम फायदा ग्राहकांनाच होणार आहे. यासोबतच रोजगाराच्या संधीही वाढू शकतात.