Google Account : तुम्ही जर काही दिवसापूर्वी नवीन स्मार्टफोन खरेदी केला असाल तर तुम्हाला तो सेट करण्यासाठी अनेक परवानग्या द्यावे लागले असले यानंतर तुम्हाला तुमच्या गुगल अकाउंटने लॉग इन करून तुमचा सर्व डेटा जमा करावा लागतो. मात्र आम्हीही तुम्हाला सांगतो तुमच्या स्मार्टफोन,मध्ये असे काही सेटिंग्ज असतात जे बाय डिफॉल्ट सक्षम असतात ज्याच्या मदतीने तुमच्यावर Google प्रत्येक क्षणी लक्ष ठेवते.
यामुळे गूगलला तुम्ही दररोज कुठे आणि केव्हा जातात याची संपूर्ण माहिती मिळत असते . लोकेशन ट्रॅकिंगसाठी Google स्मार्टफोनमध्ये आढळणारे GPS ट्रॅकर आणि सेन्सर वापरते. कंपनीचे म्हणणे आहे की अशा प्रकारे संकलित केलेल्या लोकेशन डेटाचा वापर वापरकर्त्यांना चांगला अनुभव देण्यासाठी आणि आसपासच्या ठिकाणांशी संबंधित जाहिराती दाखवण्यासाठी केला जातो. तथापि, गुगलने त्याच्या प्रत्येक हालचालींची संपूर्ण नोंद ठेवावी असे क्वचितच कुणाला वाटेल. तुमच्या गोपनीयतेसाठी तुम्ही लोकेशन ट्रॅकिंग बंद करणे महत्त्वाचे आहे.चला तर जाणून घ्या हे कसे बंद करावे.
Google अॅपमधील सेटिंग्ज बदला
Google अॅप प्रत्येक Android डिव्हाइसवर डीफॉल्टनुसार इंस्टाल केले जाते. त्यात गेल्यानंतर तुम्हाला लोकेशन डेटावर पूर्ण नियंत्रण मिळेल आणि काही सेटिंग्ज बदलावी लागतील. यासाठी खाली नमूद केलेल्या स्टेप्सचे पालन करावे लागेल.
1. प्रथम Android फोनवर Google अॅप उघडा. येथे शीर्षस्थानी उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल चिन्हावर टॅप करा.
2. स्क्रीनवर दिसणार्या मेनूमध्ये तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीच्या खाली ‘Google Account’ लिहिलेले दिसेल, त्यावर टॅप करा.
3. खात्याशी संबंधित माहिती तुमचे नाव आणि प्रोफाइल फोटोसह दर्शविली जाईल, ज्यावरून तुम्हाला ‘Data & Privacy’ वर टॅप करावे लागेल.
4. या विभागात खाली स्क्रोल केल्यावर, ‘Location History’ पर्याय दिसेल. त्यावर टॅप केल्यानंतर, तुम्हाला ‘Location History’ बंद करण्याचा आणि विद्यमान History मॅनेज करण्याचा पर्याय मिळेल.
google maps टाइमलाइनवरून डेटा हटवा
तुम्ही कधी आणि कुठे प्रवास केला याचा डेटाही गुगल मॅपवर सेव्ह केला जाऊ शकतो. ते देखील हटविणे आवश्यक आहे. तुम्हाला खाली नमूद केलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे लागेल.
1. तुमच्या Android फोनवर Google Maps अॅप लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करा आणि ते उघडा.
2. तळाशी एक्सप्लोर आणि गो पर्यायांच्या पुढे Saved केलेला पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.
3. खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला ‘टाइमलाइन’ बटण दिसेल, त्यावर टॅप केल्यानंतर map मध्ये सेव्ह केलेला तुमचा लोकेशन डेटा टाइमलाइन म्हणून दिसेल.
4. तुम्ही एका दिवसासाठी लोकेशन डेटा हटवू शकता किंवा तुम्ही टाईम रेंज देखील निवडू शकता.
5. तुम्ही ‘Remove all visits’ निवडून सर्व मागील स्थान डेटा हटवू शकता
रिअल-टाइम लोकेशन ट्रॅकिंग टाळण्यासाठी, तुमच्या फोनच्या नोटिफिकेशन पॅनलमध्ये दाखवलेला लोकेशन ऑप्शन नेहमी बंद ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचे स्थान जाणून घेण्यासाठी निवडक अॅप्सना याची आवश्यकता असू शकते, अशा परिस्थितीत काही काळ लोकेशन चालू करा आणि ते पुन्हा बंद करा.
हे पण वाचा :- Government Scheme : होणार बंपर कमाई ! ‘या’ लोकांसाठी बेस्ट आहे ‘ह्या’ योजना ; अशी करा गुंतवणूक