या गोष्टी शोधू नका
पहिली गोष्ट
गुगल चा वापर चांगल्या गोष्टी शोधण्यासाठी केला पाहिजे, बॉम्ब कसा बनवला जातो यासाठी नाही. बॉम्ब कसा बनवायचा याबद्दल गुगलवर सर्च केल्यास तुम्ही सुरक्षा एजन्सींच्या रडारखाली येतो आणि मग तुम्ही अडचणीत येऊ शकता.
दुसरी गोष्ट
तुम्हाला कधीही गुगलवर चाइल्ड पॉर्न म्हणजेच मुलांशी संबंधित पोर्नोग्राफिक सामग्री शोधण्याची गरज नाही. असे केल्यास तुमच्यावर योग्य ती कारवाई होऊ शकते. भारतात याबाबत कायदा आहे.
भारतीय कायदा POCSO
कायदा 2012 च्या कलम 14 नुसार, चाइल्ड पॉर्न पाहणे, बनवणे आणि आपल्या ताब्यात ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. या गुन्ह्यात पकडले गेल्यास 5 ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे.तिसरी गोष्ट
कोणत्याही दहशतवादी संघटनेत कसे सामील व्हावे हे तुम्ही गुगलवर कधीही शोधू नये. हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि तुम्ही असे करत असल्याचे आढळल्यास, तुमच्यावर योग्य कायदेशीर कारवाई होऊ शकते.
चौथी गोष्ट
गर्भपाताच्या पद्धतींबद्दल गुगलवर कधीही सर्च करू नका, कारण इथे तुम्हाला अशा अनेक पद्धती सापडतील ज्या तुम्हाला अडचणीत आणू शकतात.
त्यामुळे गर्भपाताबद्दल काही जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा. त्याच वेळी, डॉक्टरांच्या योग्य परवानगीशिवाय गर्भपात करणे भारतात बेकायदेशीर आहे.