ताज्या बातम्या

Google Users Alert : गुगलवर सर्च करताय ‘या’ गोष्टी? वेळीच सावध व्हा नाहीतर खावी लागणार जेलची हवा

Google Users Alert : जगभरातील जवळपास सर्वजण गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. गुगलवर एका मिनिटात कितीतरी माहिती समोर येते. गुगल अर्थातच माहितीचे भांडार आहे. अनेक क्लासेस गुगलवर उपलब्ध आहेत. याच गुगलमुळे सर्व जग एकत्र आले आहे.

गुगलचे खूप फायदे आहेत. तसेच गुगलचे खूप तोटेही आहेत. जर तुम्ही गुगलवर कोणतीही बेकायदेशीर माहिती शोधली तर तुम्हाला जेलची हवा खावी लागते. इतकंच नाही तर तुमच्या एका चुकीमुळे तुम्हाला हजारो किंवा लाखो रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

गुगलवर या गोष्टी शोधणे टाळा

दहशतवादी संघटनेशी निगडित शोधू नका

जर तुम्ही गुगल किंवा सोशल मीडियावर असे काहीतरी शोधले की ज्यामध्ये कोणत्याही दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी ऑफर किंवा संभाषण इत्यादींचा समावेश आहे. तर त्यामुळे तुम्ही खूप मोठ्या अडचणीत येऊ शकता. जर तुम्ही असे केले तर सुरक्षा यंत्रणा तुमच्यावर बारीक नजर ठेवून तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.

चाइल्ड पॉर्न

चुकूनही कधीही गुगलवर चाइल्ड पॉर्न किंवा मुलांशी निगडित पोर्नोग्राफिक सामग्री शोधू नका. कारण असे करणे कायद्याने बेकायदेशीर आहे. जर तुम्ही असे करताना सापडला तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल.

इतकेच नाही तर हे लक्षात ठेवा की चाइल्ड पॉर्न पाहणे, बनवणे आणि बाळगणे कायद्याने बेकायदेशीर आहे. भारतात POCSO कायदा 2012 च्या कलम 14 अंतर्गत गुन्हा आहे. यामध्ये जर तुम्ही पकडले गेला आणि तुम्ही दोषी सापडला तर 5 ते 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.

बॉम्ब कसा बनवतात?

अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की बॉम्ब कसा बनतो आणि त्याची पद्धत काय? परंतु तुम्ही हे कधीही करू नका. जर तुम्ही असे केले तर तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर याल आणि त्यानंतर तुमच्यावर योग्य कारवाई केली तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts