ताज्या बातम्या

या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर एकाकी

Maharashtra Politics : अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगरी करावे, अशी मागणी करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर एकाकी पडल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या पक्षाकडूनही कोणीही त्यांना पाठिंबा दिली नाही. उलट विरोधातच मते व्यक्त केली आहेत. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही यासंबंधी प्रतिकूल मत व्यक्त केले आहे.

तर हिंदुत्तवादी संघटनांची दुसऱ्या नावाची मागणी आहे. सामान्य नागरिकांना मात्र या मुद्द्यात फारस रस नसल्याचे आढळून आले. चौंडी येथील कार्यक्रमानंतर पडळकर यांनी ही मागणी केली होती.

त्यावर खासदार डॉ. विखे यांना प्रतिक्रिया विचारले असता ते म्हणाले, हा मुद्दा आमच्या अजेंड्यावर नव्हता. त्यामुळे त्यावर बोलण्याची गरज नाही. या मुद्द्याच्या आधारे आम्ही मते मागितलेली नाहीत. त्यापेक्षा विकास कामे करण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे.

जिल्ह्याच्या नामांतराचा विषय महत्वाचा नसून जनतेचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे माझा अजिंठा हा विकासाचा आहे, असेही विखे पाटील म्हणाले. भाजपमधील अन्य कोणीही पडळकर यांच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही. नगर जिल्ह्यातील सामान्यांमधूनही यासंबंधी कोणी पुढे आले नाही.

उलट मनसेने हिंदुत्ववादी संघटनांच्या अंबिकानगर नावाचा मुद्दा पुढे आणला आहे. जिल्ह्याशी पडळकर नसलेल्या पडळकारांनी यात ढवळाढवळ करू नये, असेही मनसेने सुनावले आहे. त्यामुळे सध्या तरी पडळकर एकाकी पडल्याचे चित्र आहे. तिकडे औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांकराच्या मुद्द्याने वेग घेतला आहे. नगरला मात्र मतमतांतरे आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts