Government Bank : तुम्ही देखील सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना एक महत्वाची सूचना दिली आहे. या सूचनेनुसार रविवारी बँकेच्या काही सेवा 4 तासांसाठी ठप्प राहणार आहे.
यामुळे ग्राहकांना पैशाची व्यवहार करण्यास अडचणी निर्माण होऊ शकते. रविवारी 24 तास सेवा ठप्प राहणार आहे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी, 18 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 00:30 ते 04:30 पर्यंत अनुसूचित देखभाल क्रियाकलाप नियोजित करण्यात आला आहे.
आमचे इंटरनेट बँकिंग, UPI, मोबाईल बँकिंग, IMPS आणि BBPS काम करणार नाहीत. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि तुमच्या सहकार्याची खूप प्रशंसा करतो. असं ट्विट बँकेने केला आहे.
व्हिडिओ केवायसीद्वारे खाते उघडण्याची सुविधा
इंडियन बँक ग्राहकांना त्यांच्या घरी बसून खाते उघडण्याची सुविधा देते. शाखेत न जाता बँक खाते उघडायचे आहे का? काळजी नाही. इंडियन बँकेच्या व्हिडिओ कस्टमर आयडेंटिफिकेशन प्रोसेस (V-CIP) सह, तुम्ही आता तुमचे बँक खाते कधीही, कुठेही उघडू शकता.
सप्टेंबर तिमाहीच्या नफ्यात 13% वाढ
चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत इंडियन बँकेचा निव्वळ नफा 13% ने वाढून रु. 1,225 कोटी झाला आहे. बुडीत कर्जासाठी म्हणजेच एनपीएसाठी तरतूद कमी केल्यामुळे बँकेचा निव्वळ नफा वाढला. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेने 1,089 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
हे पण वाचा :- Natural Farming : चर्चा तर होणारच ! ‘हा’ शेतकरी फळे आणि भाजीपाला पिकवून कमवतो 2 लाखांहून अधिक पैसे; जाणून घ्या कसं