Government Employee News : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने मध्यमवर्गीयांना एक मोठी भेट दिली.
सरकारने जीएसटी च्या दरात कपात केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटीचे दोन स्लॅब रद्द केलेत.

12% आणि 28% हे दोन स्लॅब रद्द झालेत. आता पाच टक्के आणि 18% हे दोन स्लॅब शिल्लक आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अनेक वस्तूंवरील जीएसटी सरकारने कमी केला आहे. काही जीवनावश्यक वस्तूंचा जीएसटी शून्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान मध्यमवर्गीयांना दिलासा दिल्यानंतर आता केंद्रातील सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची बातमी समोर आलीये. दिवाळीच्या आधी सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत.
महागाई भत्ता वाढ – ऑक्टोबर महिन्यात सातव्या वेतन आयोगातील शासकीय कर्मचाऱ्यांना व पेन्शन धारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 55 टक्के महागाई भत्ता मिळतोय.
यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे. अर्थात सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 58 टक्के होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय दिवाळीच्या आधी निर्गमित होईल. पण प्रत्यक्षात ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे.
महागाई भत्ता फरक – शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढीची भेट दिली जाते.
पण महागाई भत्ता वाढीचा अधिकृत निर्णय हा साधारणता मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात होत असतो. यानुसार मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला होता. आता ऑक्टोबर मध्ये तीन टक्क्यांची वाढ होणार आहे.
ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार असल्याने महागाई भत्ता थकबाकीची सुद्धा रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढ तसेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी मिळणार आहे.
दिवाळी बोनस मिळणार – महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीच्या काळात बोनस दिला जातो. यावर्षी देखील शासकीय कर्मचाऱ्यांना बोनस मिळेल अशी आशा आहे. सरकार पुढील महिन्यात याची घोषणा करू शकते.