Govt Scheme : केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्याचा फायदा जनतेला होतो. सरकारच्या या योजनांची काही लोकांना माहिती असते तर काही लोकांना याबद्दल कोणतीच माहिती नसते. सरकारची अशीच एक योजना आहे ती म्हणजे आंबेडकर नूतनीकरण योजना होय.
अनेकांना सरकारच्या या शानदार योजनेबद्दल कसलीच माहिती नाही. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. सरकार लोकांना त्यांची घरे दुरुस्त करण्यासाठी 80 हजार रुपयांची आर्थिक मदत करत आहे. त्यामुळे आत्ताच या योजनेसाठी अर्ज करा.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला हरियाणा सरकारच्या http://saralharyana.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. होमपेज उघडल्यानंतर तेथे लॉगिन करा.
जर तुम्ही या वेबसाइटला पहिल्यांदा भेट देत असल्यास तुम्हाला येथे नोंदणी करावी लागणार आहे. येथे तुम्हाला नवीन वापरकर्ता हा पर्याय निवडून या वेबसाइटवर नोंदणी करता येईल.
नोंदणी केल्यानंतर तुम्हाला आंबेडकर रिन्यूअल स्कीममधील अर्जाच्या लिंकवर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक अर्ज उघडेल. येथे तुम्हाला तुमची आवश्यक माहिती टाका. हे लक्षात ठेवा की तपशील भरताना त्यात कोणतीही चूक नसावी.
तुम्ही सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. सर्व आवश्यक प्रक्रिया केल्यानंतर, तुम्हाला 30 रुपये भरावे लागणार आहेत. या सर्व आवश्यक प्रक्रियेचे अनुसरण करून, तुम्ही आंबेडकर नूतनीकरण योजनेसाठी सहजपणे अर्ज दाखल करू शकता.