अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Government Scheme:- भारतातील शेतकरी बांधव आता शेती समवेतच पशुपालन व्यवसायाकडे वळू लागले आहेत. शेतकऱ्यांमध्ये सध्या मत्स्यपालनाचा व्यवसाय (Fisheries business) खूपच लोकप्रिय होत आहे.
सरकारही (Government) शेतकऱ्यांना या क्षेत्राकडे जाण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मत्स्य संपदा योजना (Prime Minister’s Fisheries Wealth Scheme) राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत मत्स्य व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान दिले जाते.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पीएम मत्स्य संपदा योजना (Prime Minister Matsya Sampada Yojana) सप्टेंबर 2020 मध्ये सुरु करण्यात आली होती.
मत्स्यपालन व्यवसायातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या योजनांमध्ये याची गणना केली जाते. याअंतर्गत शेतकऱ्यांना मत्स्यपालनासाठी कर्ज आणि मोफत प्रशिक्षण दिले जाते. शेतकरी मित्रांनो जर आपणास मत्स्यपालनासाठी कर्ज घ्यायचे असेल तर प्रथम तुम्हाला तुमच्या परिसरातील मत्स्य विभागाशी संपर्क साधावा लागेल.
कोणाला मिळते 60 टक्के अनुदान:-
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व महिलांना मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी 60 टक्के अनुदान दिले जाते. याशिवाय, इतर सर्वांसाठी 40 टक्के पर्यंत सबसिडी प्रदान केली जाते. तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइट https://dof.gov.in/pmmsy वर जाऊन अर्ज करू शकता.
अनुदान प्राप्तीसाठी योग्यता :-
अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
देशातील सर्व मत्स्य उत्पादक शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
या योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना लाभ दिला जाणार आहे.
पीएम मत्स्य संपदा योजनेअंतर्गत, फिश फार्मर क्रेडिट कार्ड मिळवून, तुम्ही हमीशिवाय 1.60 लाख कर्ज घेऊ शकता. याशिवाय या क्रेडिट कार्डवरून जास्तीत जास्त 3 लाख रुपयांचे कर्ज घेता येईल. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की किसान क्रेडिट कार्डवर कर्ज घेतल्यानंतर इतर कर्जाच्या तुलनेत कमी व्याज द्यावे लागते.
मत्स्यपालन व्यवसाय हा नेहमीच फायदेशीर व्यवसाय मानला जातो. या योजनेंतर्गत शेतकरी कमी खर्चात अधिक नफा मिळवू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तुम्ही हा व्यवसाय जेवढे मोठे स्तरावर सुरू कराल तेवढा नफा जास्त असेल.
असे असले तरी, आम्ही तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कृषी तज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन करू इच्छितो. जाणकार लोकांच्या मार्गदर्शनाने जर आपण हा व्यवसाय सुरू केला तर निश्चितच यातून आपण चांगला पैसा कमवू शकतात.
मित्रांनो जर आपणास हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर पंतप्रधान मत्स्य संपदा योजना याचा अवश्य लाभ घ्यावा. या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या मत्स्य विभागाशी अथवा कृषी विभागाशी आपण संपर्क साधू शकता तसेच आपल्या शंकांचे निरसन देखील करू शकता.