Ahmednagar News : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाच हाक देणऱ्यापुणतांब्यात आज पुन्हा ग्रामसभा बोलविण्यात आली आहे. काल मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीतील चर्चेची माहिती ग्रामस्थांना देण्यात येणार आहे.
त्यानंतर स्थगित केलेल्या आंदोलनासंबंधी पुढील निर्णय होणार आहे.मुंबईत १४ मागण्यांच्या ७० टक्के मुद्द्यांवर सहमती झाल्याची माहिती सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी दिली आहे. पुणतांब्यात १ पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते.
मात्र. सरकारचे चर्चेचे निमंत्रण आल्याने चार जूनला ते स्थगित करण्यात आले. त्यानंतर मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक झाली.
त्यामध्ये झालेल्या चर्चेची माहिती पुणतांब्यातील ग्रामसभेत देण्यात येणार आहे. त्यानंतर आंदोलनाचे पुढे काय करायचे? प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांचा कसा पाठपुरावा करायचा, याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.