Google Pixel 6a : शानदार ऑफर! फक्त 16,000 रुपयांमध्ये खरेदी करा Google Pixel 6a

Google Pixel 6a : जर तुम्ही स्वस्तात चांगले फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण 43,900 रुपयांचा गुगलचा Pixel 6a हा स्मार्टफोन कमी किमतीत तुमचा होऊ शकतो.फक्त 16,000 रुपयांमध्ये हा स्मार्टफोन मिळत आहे. ही संधी फ्लिपकार्टवर मिळत आहे.

फ्लिपकार्टवर मिळत आहे संधी 

लॉंचच्यावेळी भारतात Google Pixel 6a या स्मार्टफोनची किंमत 43,900 रुपये इतकी होती. तुम्ही हा फोन 29,900 रुपयांना विकत घेऊ शकता. जर तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुम्हाला 2,000 रुपयांची सवलत मिळेल. तर फेडरल बँक कार्डवर 3,000 रुपयांची सवलत मिळेल, त्यामुळे तुम्ही हा फोन 26,900 रुपयांना खरेदी करू शकता.

मिळेल एक्सचेंज ऑफर 

या फोनवर 17,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जर तुमच्याकडे जुना फोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला चांगली एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते. समजा तुमच्या जुन्या फोनची किंमत 10,000 रुपये इतकी असेल, तर तुम्ही हा फोन 16,900 रुपयांमध्ये घरी आणू शकता.

स्पेसिफिकेशन

याफोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.1-इंच फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले पॅनेल आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण आहे आणि रिफ्रेश दर 60Hz आहे. तसेच फोनमध्ये ऑक्टाकोर गुगल टेन्सर प्रोसेसर आहे जो गुगलचा इनहाऊस प्रोसेसर आहे. यामध्ये सुरक्षा प्रक्रियेसाठी Titan M2 प्रोसेसर देण्यात आला असून फोनमध्ये 6 GB पर्यंत LPDDR5 रॅमसह 128 GB पर्यंत स्टोरेज दिले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts