ताज्या बातम्या

Green Tea : गरोदरपणात ग्रीन टी पिणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या गर्भधारणेवेळी ग्रीन टी प्यावी की नाही

Green tea : ग्रीन टी शरीरास अत्यतंत फायदेशीर मानले जाते. हेल्दी ड्रिंक्स (Healthy drinks) म्हणूनही अनेक वेळा ग्रीन टी (Green tea) चे सेवन केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का गरोदरपणात (pregnant) ग्रीन टी पिणे योग्य आहे की आयोग्य? चला तर आज तुम्हाला गरोदरपणात ग्रिन टी प्यावा की नाही हे सांगणार आहोत.

हेल्दी ड्रिंक्सचा विचार केल्यास ग्रीन टी हे सर्वोत्तम पेयांपैकी एक मानले जाते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल भरपूर प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त, कॅटेचिन्स (EGCG) देखील त्यात उपस्थित आहेत. ग्रीन टीचे सेवन (Good for health) आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

हे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. वजन कमी करणे, बीपी नियंत्रण, रक्तातील साखर नियंत्रण, कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

पण अनेकदा महिलांच्या मनात प्रश्न येतो की गरोदरपणात ग्रीन टी सेवन (Drinking green tea during pregnancy) करणे सुरक्षित आहे का? असे मानले जाते की गरोदरपणात कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे,

कारण कॅफिनच्या अतिसेवनाने गर्भपात होण्याबरोबरच गर्भधारणेदरम्यान इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. ग्रीन टीमध्ये काही प्रमाणात कॅफिन देखील असते. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की गरोदर महिलांनी ग्रीन टी प्यावी की नाही.

गरोदरपणात ग्रीन टी पिणे सुरक्षित आहे का?

न्यूयॉर्क स्थित डॉक्टर नॅथन फॉक्स (माता आणि गर्भ औषध विशेषज्ञ, एमडी) यांनी एव्हरीवेल फॅमिली यांना सांगितले की गरोदरपणात ग्रीन टी पिणे पूर्णपणे सुरक्षित आहे. ग्रीन टीमध्ये कॅफिनचे प्रमाण खूपच कमी असते. मात्र गरोदर महिलांनी हे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.

ते जास्त प्रमाणात हानिकारक ठरू शकते. अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टच्या मते, गरोदरपणात कॅफिनचे सेवन दररोज 200 मिलीग्रामपेक्षा कमी असावे.

एक कप ग्रीन टीमध्ये सुमारे 25 मिलीग्राम कॅफिन असते. गर्भवती महिला 3-4 कप ग्रीन टी पिऊ शकतात. जर ग्रीन टी मर्यादित प्रमाणात प्यायली तर ती गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

गरोदर महिलांसाठी ग्रीन टीचे फायदे

ग्रीन टी गरोदरपणात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हे रोग प्रतिकारशक्ती देखील मजबूत करते, ज्यामुळे प्रीक्लेम्पसियासारख्या गर्भधारणेच्या गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय, गर्भधारणेदरम्यान मळमळ दूर करण्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे.

ग्रीन टी चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी ओळखली जाते, ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान तुम्हाला शांत आणि आरामदायक वाटण्यास मदत होते. ग्रीन टी प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी ग्रीन टी देखील उपयुक्त आहे.

जरी गरोदरपणात ग्रीन टीचे सेवन करणे सुरक्षित आहे, परंतु तरीही तुम्ही त्याचे जास्त सेवन टाळले पाहिजे. 3-4 कप पेक्षा जास्त न पिण्याचा प्रयत्न करा.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts