अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-देशभरात आरोग्य कर्मचारी पोलीस कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले आहेत. मात्र करोनाच्या लढाईत प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून शिक्षक कर्मचारी उभे राहिले आहेत.
मात्र आता हेच गुरुजी लसीकरणापासून वंचित राहू लागले आहे. स्थानिक आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध होत नसल्याने, शिक्षकांना लस मिळण्यास अडचण येत आहे.
शासनाकडून फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्राथमिक शिक्षक आदी कोरोना योद्ध्यांना सर्वप्रथम कोविड १९ प्रतिबंधक लस म्हणून कोवॅक्सिन, कोविशिल्डचे लसीकरणास सुरुवात केली आहे.
आता तर १८ वर्षांपुढील नागरिकांनाही लसीकरण केले जाणार आहे. मात्र इतरांप्रमाणेच फ्रंट वर्कर म्हणूनच काम करणारे शिक्षक लसीकरणापासून वंचित राहिले आहे.
शिक्षकांचे लसीकरण करा अशी मागणी शिक्षक संघटनांनी वेळोवेळी निवेदन देऊन प्रशासनाकडे केली आहे. मात्र शिक्षकांच्या लसीकरण संदर्भात नियोजनाचा अभाव असल्याचे चित्र आहे.
काही ठिकाणी स्थानिक तहसीलदारांच्या दूरध्वनी संदेशाच्या आधारे शिक्षण प्रशासनाने पत्र काढून स्थानिक पातळी लसीकरण करा असे सुचवले आहेत.
तथापि स्थानिक पातळीवर लस उपलब्ध होत नसल्यामुळे आणि शिक्षक कर्मचार्यांना प्राधान्याची भूमिका नसल्यामुळे शिक्षकांना लसीकरणात अडचणी येत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे शिक्षकांना प्राधान्य देणे विलास देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आदेशित करावे अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.