Hair Care Tips : सध्याच्या काळात डिटॉक्स (Detox) हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आहे. शरीर आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी डिटॉक्स प्रक्रिया महत्वाची आहे. शरीर आणि त्वचेसोबतच आपल्या केसांनाही डिटॉक्सची (Hair Detox) गरज असते.
हेअर डिटॉक्समुळे केस आणि केसांच्या मुळाशी म्हणजेच टाळूशी असणारे विषारी घटक (Toxic components) आणि इतर अपायकारक घटक निघून जातात. त्यामुळे केसांची मूळे (Hair roots) निरोगी (Healthy) होतात. त्याचबरोबर केसांच्या अनेक समस्या सोडवण्यासही हेअर डिटॉक्स ही प्रक्रिया मदत करते.

केस का खाजतात?
खरं तर, आपण आपले केस रोज धुतो, त्यानंतरही घाण, तेल, घाम टाळूवर चिकटतो, ज्यामुळे केस तेलकट होतात. त्यामुळे केसांमध्ये कोंडा (Dandruff), खाज सुटणे (Itching) अशा समस्या निर्माण होतात. हे टाळण्यासाठी टाळूचे डिटॉक्स करणे महत्वाचे आहे. हे टाळूची खोल साफ करून केसांच्या समस्या कमी करण्यास मदत करते.
जाणून घ्या- हेअर डिटॉक्स म्हणजे काय?
केसांच्या टाळूच्या खोल साफ करण्याच्या प्रक्रियेला हेअर डिटॉक्स म्हणतात. यावर उपाय म्हणजे केसांमध्ये शॅम्पू आणि स्कॅल्प स्क्रबच्या मदतीने केसांची खोल साफसफाई करता येते. याशिवाय स्टाइलिंग टूल्समुळे केसांना होणारे नुकसानही टाळते. यासोबतच ही पद्धत केसांच्या टाळूला श्वास घेण्यासही मदत करते, त्यानंतर तुमचे केसही वाढतात.