अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- जिल्ह्यात शनिवारी आढळलेल्या ५९० काेरोना बाधितांपैकी १११ रुग्ण पारनेर तालुक्यातील विविध गावांत अाढळल्याने तहसीलदार ज्योती देवरे निम्मा तालुका संवेदनशील म्हणून जाहीर केला आहे.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या काेरोना संसर्गाचा वेगाने होणारा फैलाव रोखण्यासाठी पारनेर शहरासह तालुक्यातील ७० गावे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
संवेदनशील गावातील शासकीय कर्मचाऱ्यांनी परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये.परगावावरून आलेल्या व्यक्तींना १० दिवस प्राथमिक शाळेत विलगीकरणात ठेवावे. संवेदनशील गावांमध्ये रविवारी बंद पाळावा.
रविवार व सोमवार या दोन दिवसात प्रत्येक गावात किमान ४०० रॅपिड टेस्ट व १५० आरटीपीसीआर टेस्ट तपासण्या करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना तहसीलदार देवरे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
दोन दिवसांत संवेदनशील गावांपैकी कोणत्याही गावास तालुकास्तरीय समिती भेट देणार आहे.गावात अनुपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आहे.
अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार देवरे यांनी दिला आहे.