ताज्या बातम्या

ऐन हंगामात उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने कोकणातील हापूस आंबा शेती संकटात

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi Marathi :- यंदा कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना वातावरणातील बदलामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

अवकाळी पाऊस, मधल्या काळातील धुके, गेल्या आठवड्यातील उन्हाचा सरासरी ३६ अंशाचा पारा आणि आता पुन्हा पावसाचे वातावरण झाले आहे.

यामुळे ऐन हंगामात कोकणातील आंबा उत्पादनात घट झाली आहे. सुरुवातीच्या काळात आंब्याच्या झाडाला अपेक्षा पेक्षा मोहरा जास्त लागला होता.

त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते मात्र त्यांचा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. ढगाळ वातावरण व नंतर पावसामुळे बरसा मोहर गळून गेला.

तर राहिलेल्या मोहरा पासून तयार झालेल्या कोवळ्या फळाला वातावरणातील उष्णता न सहन झाल्याने बारीक कैरी पिवळी पडून गळू गेली आहे. यामुळे जवळपास कोकणातील 90 टक्के आंब्याच्या बागा हे उध्वस्त झालेला आहे.

तर रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी तापमान हे 36 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे. त्याचा परिणाम हा आंब्यासह, काजू कोमाला फटका बसणार असल्याचे दिसत आहे.

त्यामुळे हे नुकसान यंदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय त्यांच्याकडे नसून यंदा वातावरणातील बदलाने आंबा उत्पादकांचे पार कंबरडे मोडले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts