अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- प्रवरा सहकरी बॅकेच्या चेअरमन पदावर अशोक म्हसे यांची नियुक्ती आज मंगळवार रोजी करण्यात आली आहे. तसेच व्हा.चेअरमन पदी बापुसाहेब वडीतके यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या दोन्ही पदधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. दरम्यान लोणीतील प्रवरा सहकरी बॅकेचे पदाधिकारी निवडण्यासाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलाविण्यात आली होती.
सहकरी संस्थाचे उपनिंबधक जितेंद्र शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत चेअरमन पदासाठी अशोक म्हसे यांच्या नावाची सूचना माजी चेअरमन बाळासाहेब भवर यांनी मांडली त्यास संचालक छगन पुलाटे यांनी अनुमोदन दिले.
व्हा.चेअरमन पदासाठी बापुसाहेब वडीतके यांच्या नावाची सूचना माजी व्हा.चेअरमन अशोक आसावा त्यास संचालक प्रकाश शिरसाठ यांनी अनुमोदन दिले आहे.