अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फारसे बाहेर जात नाहीत. एक तर ते वर्षावर असतात किंवा मातोश्रीवर असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा फारसा काही प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे त्यांची सुरक्षा काढून आपण आपल्या घरातून एक आदर्श करून देऊ शकतो”, असा उपरोधिक सल्ला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिला आहे.
आपल्या ट्विटर अकाउंटवरून वाघ यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यातून शिवसेनेवर आणि संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे. त्यात वाघ यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च ज्ञानी आणि सोनिया सेनेचे प्रमुख संजय राऊत यांनी
आपल्या प्रात:कालीन सवयीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देशातील इतर बड्या नेत्यांना पुरवली जाणारी सुरक्षा अनाठायी असल्याचा जावईशोध लावला आहे. असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
दरम्यान, खरंतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर मोदी परखड भूमिका घेत असतात. अशा वेळी त्यांची सुरक्षा हा राष्ट्रीय विषय आहे. पण हा विषय खूप मोठा आहे. त्यामुळे तुम्हाला तो कितपत कळेल, माहिती नाही.
तरी आपल्या वाटत असेल की हा खर्च अनाठायी आहे, तर याची सुरुवात आपण आपल्या घरापासून केली तर काय हरकत आहे? आपलं राष्ट्रीय पातळीवरचं अस्तित्व बिहार निवडणुकीतून जनतेसमोर आलं आहे. त्यामुळे देशाची काळजी करण्यासाठी मोदी समर्थ आहेत. आपण आपलं ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणणं फार गरजेचं आहे.
रेल्वे बंद आहेत. लोकांना त्रास होतोय, हेलपाटे मारावे लागत आहेत. जरा पाऊस पडला की मुंबईची तुंबई होतेय. या समस्येवर आपण आपल्या दिव्य ज्ञानाचा प्रकाश टाकणं गरजेचं आहे”, असं चित्रा वाघ यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. संजय राऊत यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी,
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा अनाठायी आहे असा जावईशोध लावला आहे संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशमधील लोकसंख्या नियंत्रण धोरणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपा सरकारवर टीका केली आहे.
सामनाच्या रोखठोक या सदरामधून संजय राऊत यांनी लोकसंख्या नियंत्रण धोरणाविषयी भूमिका मांडली आहे. “विटंबना म्हणा किंवा विडंबना, योगी महाराजांनी उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लावलाच, तर भारतीय जनता पक्षाचे १६० आमदार बाद होतील. कारण या आमदारांना दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत.