‘यांनी’ कोरोनाच्या नावाखाली अनेक योजना बंद केल्या!

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- सामाजिक, राजकीय व विकास कामाचा कोणताही अनुभव नसताना माझ्यावर टिका करावी हे हास्यास्पद आहे.राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरुच असतात.

कोणी कोणाबद्दल काय बोलाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. विकासाची कामे करुन जनतेच्या दारात जाण्याचा आमची परंपरा आहे. जनता नेहमीच आमच्या सोबत राहीलेली असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. पुढे आमदारराजळे म्हणाल्या की, राजकारणात टिका टिपण्णी सुरु असते.

मात्र ती कोणी कोणावर करावी याला मर्यादा असतात. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अद्याप जिल्ह्यातील शासकिय समित्यावरील सदस्यांची नावे जाहीर केली नाहीत. दोन वर्षापासुन समित्या नसल्याने अनेक अडचणी उभ्या राहील्या आहेत. गरीबांना मिळणारे संजयगांधी योजनेचे अनुदान असेल व इतर कामे रखडली आहेत.

पंकजा मुंडे व राम शिंदे मंत्री असताना जलसंधारणाचा मोठा निधी तालुक्याला मिळाला. त्यावेळच्या सरकारने मंजुर केलेली विकासकामेच अजुन सुरु आहेत. नव्या सरकारने अनेक योजना बंद केल्या आहेत. कोरोनाचे संकटाचे कारण सांगुन विकासकामे ठप्प आहेत. आम्ही पंचवीस ते तिस गावात ग्रामपंचायत कार्यालये दिली आहेत.

विकासाची कामे केली म्हणुन जनतेने आम्हाला स्विकारले आहे.अकोला गावात मी पंधरा बंधारे दिले आहेत.तेथे विकासाची कामे केली म्हणुन तेथील लोकांनी मला मदत केली आहे. आम्ही विकासाच्या मुद्यावर लोकामधे आहोत.लोकांना सर्व समजते. असा टोला त्यांनी विरोधकांना लावला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts