ताज्या बातम्या

तिखट मिरचीचा गोडवा!! ‘या’ अवलियाने तीन एकरात कमवले 50 लाख; वाचा ही भन्नाट यशोगाथा

Farmer succes story : यावर्षी अतिरिक्त उसाचा (Extra Sugarcane) प्रश्न मोठा ऐरणीवर होता. यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र अतिरिक्त ऊसाविषयी मोठ्या चर्चा रंगल्या होत्या.

यामुळे बीड जिल्ह्यातील (Beed) एका ऊस उत्पादक शेतकऱ्यांने (Sugarcane Farmer) उसाला पर्यायी पीक म्हणून नवीन पिकाची शोधाशोध सुरू केली. अतिरिक्त ऊस डोकेदुखी सिद्ध झाला असल्याने जिल्ह्यातील धारूर येथील सुनील शिंगारे या नवयुवक शेतकऱ्याने मिरची (Chili) या भाजीपाला वर्गीय पिकाच्या लागवडीचा निर्णय घेतला.

यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या तीन एकर शेत जमिनीत मिरचीची यशस्वी लागवड (Chili Farming) केली. विशेष म्हणजे आतापर्यंत सुनील यांनी लागवड केलेल्या मिरचीच्या पिकातून दोनदां उत्पादन घेतले गेले आहे.

यातून जवळपास 55 टन मिरचीचे उत्पादन झाले असून त्यांना या बदल्यात पंचवीस लाखांची कमाई झाली आहे. अजून मिरचीच्या पिकातून तीनदा तोडा होणार असल्याचे सुनील यांनी स्पष्ट केले. सुनील यांना उर्वरित मिरचीच्या पिकातून एवढेच उत्पन्न मिळण्याची आशा आहे निश्चितच सुनील यांना तीन एकर क्षेत्रातून पन्नास लाखांची कमाई होणार असल्याचा अंदाज आहे.

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्याच्या मौजे आरणवाडी येथे वास्तव्यास असलेले सुनील शिनगारे यांना तीन एकर क्षेत्रात पन्नास लाखांची कमाई होणार असल्याने पंचक्रोशीत या शेतकऱ्याचे तोंड भरुन कौतुक केले जात आहे.

खर पाहता मौजे आरणवाडी 2000 पर्यंत दुष्काळी गाव म्हणून ओळखले जायचे. मात्र त्यानंतर गावात जलसंधारणाची कामे झाली. घागरवाडा हा तलाव बनवण्यात आला. या तलावामुळे गावात उसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली.

आज हे गाव ऊस उत्पादनासाठी संपूर्ण तालुक्यात नावाजलेले आहे. मात्र असे असले तरी या वर्षी उसाचे अधिक उत्पादन निघाल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न संपूर्ण हंगामभर कायम राहिला.

यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला सोन्यासारखा उस अतिशय कवडीमोल दरात विक्री करावा लागला. अनेकांना ऊस कारखानापर्यंत पाठवणे देखील अजून शक्य झालेले नाही. यामुळे अनेक शेतकरी बांधव पर्यायी पिकाकडे वळू लागले.

सुनील हेदेखील अशाचं शेतकऱ्यांपैकी एक आहेत. अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला त्यामुळे सुनील यांनी कृषी सहाय्यक यांचा सल्ला घेत मिरचीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. मिरचीची लागवड बेड पद्धतीने केली असून यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला शिवाय पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर देखील सुनील यांनी केला. तीन एकर क्षेत्रात 930 या मिरचीच्या सुधारित जातीची सुमारे 45 हजार रोपांची लागवड करण्यात आली.

सुनील यांनी लागवड केलेल्या मिरचीचे एप्रिल मध्ये एकूण दोन तोडे झाले. विशेष म्हणजे मिरचीचा माल बांधावरच व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आला. आतापर्यंत एकूण 55 टन मिरची विकली गेली असल्याचे सुनील यांनी नमूद केले.

मिरचीला 54 रुपये प्रति किलो असा दर मिळाला म्हणजेच त्यांना एकूण 25 लाखांचे उत्पन्न यातून मिळाले आहे. अजूनही मिरचीची काढणी सुरूच आहे यामुळे त्यांना 50 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची आशा आहे. निश्चितच सुनील यांनी केलेला हा बदल त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून इतर शेतकऱ्यांना देखील यातून प्रेरणा मिळणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts