मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी (CM) संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यांना इंधनावरील व्हॅट कमी करण्यास सांगितले आहे. परंतु शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बोलावलेल्या बैठकीवर मी बोलणार नाही. ते योग्यही नाही. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ती बैठक होती.
पंतप्रधान कोरोना स्थितीवर मार्गदर्शन करणार होते. पण त्यांनी इतर विषयांवरच तारा छेडल्या असे म्हणत त्यांनी मोदींना टोला लगावला आहे.
ममता बॅनर्जी असतील, उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) असतील, चंद्रशेखर राव असतील. त्यांची विधाने पाहिल्यावर कळेल पंतप्रधानांचा कालचा संवाद एकतर्फी होता. बिगर भाजप शासित राज्यातील मुख्यंत्र्यांना टोमणे मारण्याचं काम जास्त झालं.
पंतप्रधानांकडून ही अपेक्षा नाही. काल जो विषय निघाला तो अनावश्यक होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठी बाण्याला जागून जे काही सांगायचं ते सांगितलं. त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
बिगर भाजप शासित मुख्यमंत्र्यांनी त्यांची वेदना व्यक्त केली आहे. कोरोनाची जी स्थिती निर्माण झाली आहे. त्यावर पंतप्रधानांनी बोलायला हवं होतं. इतरांचं म्हणणं जाऊन घ्यायला हवं होतं. पण त्यांनी एकतर्फी डायलॉग केला.
जिथे भाजपचे (BJP) मुख्यमंत्री नाहीत तिथे पंतप्रधानांची भूमिका वेगळी आणि ज्या राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत, तिथे भूमिका वेगळी हे योग्य नाही. राष्ट्रासाठी एक भूमिका असावी ती दिसली नाही असेही राऊत म्हणाले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतचे लकडावालाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मला कोणी आरोप केला माहीत नाही.
संबंधित व्यक्तीचे कुणाशी व्यवहार झाले. ज्याच्याशी आर्थिक व्यवहार झाले. त्याला ईडीने चौकशीसाठी का बोलावले नाही? हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर द्यावं. सत्य बोललं की त्यापासून पळ काढायाचा, भूमिगत व्हायचं आणि संभ्रम निर्माण करायचा हे त्यांचं धोरण आहे.
काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतचे लकडावालाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मला कोणी आरोप केला माहीत नाही. संबंधित व्यक्तीचे कुणाशी व्यवहार झाले. ज्याच्याशी आर्थिक व्यवहार झाले.
त्याला ईडीने चौकशीसाठी का बोलावले नाही? हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर द्यावं. सत्य बोललं की त्यापासून पळ काढायाचा, भूमिगत व्हायचं आणि संभ्रम निर्माण करायचा हे त्यांचं धोरण आहे असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.