Maharashtra News:महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील टळ पाहणारी सुनावणी आजच घेण्याचे सुप्रिम कोर्टाने मान्य केले आहे. त्यामुळे लवकरच ही सुनावणी सुरू होईल.
मात्र, यामध्ये काय निर्णय होणार? निवृत्तीच्या वाटेवरील सरन्यायाधीश हे प्रकरण घटनापीठाकडे सोपविण्यात आदेश देणार का? याकडे लक्ष लागले आहे.
कालची सुनावणी आज ठेवण्यात आली होती. मात्र, ती आजही होत नसल्याचे पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी हा प्रकार न्यायालयाच्या लक्षात आणून दिला.
हे प्रकरण सातत्याने लांबणीवर जात असल्याचे त्यांनी निदर्शास आणून दिले. त्यानंतर त्यानंतर कोर्टाने आजच्याच कामकाजामध्ये समाविष्ट केले आहे.
त्यामुळे आज दिवसभरात यावर केव्हाही सुनावणी होऊ शकते. मात्र, यामध्ये नेमके काय होणार? की पुन्हा तारीख पडणार? याकडे लक्ष लागले आहे.