Lava Blaze 5G : Lava ही एक दिग्ग्ज टेक कंपनी असून या कंपनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि इतर टेक कंपन्यांना टक्कर देण्यासाठी स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच पुन्हा एकदा कंपनीने आपला एक 5G स्मार्टफोन लाँच केला आहे.
कंपनीच्या Lava Blaze 5G च्या स्मार्टफोनची किंमत 12,000 रुपयांपेक्षा कमी आहे. परंतु, येत्या 16 फेब्रुवारीपासून या स्मार्टफोनसाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जाणून घेऊयात कंपनीच्या या स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती.
जाणून घ्या कंपनीच्या फोनची किंमत आणि उपलब्धता
कंपनीचा हा Blaze 5G 6GB व्हेरिएंट 15 फेब्रुवारी रोजी 11,499 रुपयांच्या प्रास्ताविक किमतीत विकत घेता येणार आहे. हे लक्षात घ्या की 16 फेब्रुवारीपासून या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये इतकी होणार आहे. जर तुम्हाला हा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर Amazon आणि Lava e-store वरून तुम्ही तो खरेदी करू शकता. कंपनीचा हा फोन ग्लास ग्रीन आणि ग्लास ब्लू या प्रीमियम ग्लास बॅक डिझाइनसह येतो.
जाणून घ्या फीचर्स
हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 द्वारे समर्थित, असून हा LPDDR4X मेमरी आणि UFS 2.2 स्टोरेजसह 2.2 GHz च्या octa-core प्रोसेसरसह येतो. यात 6GB+3GB अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम आणि 128GB स्टोरेज लॅग-फ्री वापरकर्ता अनुभवासाठी आहे. हा फोन Android 12 OS सह येतो जो कॉल रेकॉर्डिंगसह स्वच्छ आणि ब्लोट-फ्री सॉफ्टवेअर अनुभव देतो.
कंपनीच्या या 5G स्मार्टफोनला EIS सपोर्टसह 50 मेगापिक्सेल AI ट्रिपल रिअर कॅमेरा आणि ब्युटी, HDR, नाईट, पोर्ट्रेट, मॅक्रो, प्रो, UHD, पॅनोरमा, स्लो मोशन, फिल्टर्स, GIF आणि टाइमलॅप्स यासारख्या विविध कॅमेरा फीचर्ससह 2K व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळत आहे. तर सेल्फीसाठी, यात स्क्रीन फ्लॅशसह 8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.
कंपनीचा हा स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट आणि WideWine L1 सपोर्टसह मोठ्या 16.55 सेमी (6.5-इंच) HD+ IPS डिस्प्लेसह येतो. वापरकर्त्यांच्या सेफ्टीसाठी फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट अनलॉक देते. हे मेमरी कार्ड स्लॉटसह येते जे 1 TB पर्यंत स्टोरेज ठेवू शकते. हा 5000mAh बॅटरीसह सुसज्ज असून जो त्याच्या अल्ट्रा-कार्यक्षम 7nm चिपसेटमुळे बॅटरीचा वापर ऑप्टिमाइझ करतो.