ताज्या बातम्या

‘तो’ सर्जा राजासोबत शेतात गेला मात्र विपरीत घडले अन…

Ahmednagar News:सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतातील कामे ठप्प झाली आहेत. अशातच त्याने आपले दोन्ही बैलं गाडीला जुंपली व चारा आणायला शेताच्या दिशेने निघाला.

मात्र रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक बसून डोळ्यासमोर दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून या दुर्दैवी घटनेतून शेतकरी वाचला.ही घटना संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव शिवारात घडली आहे.

सुरेश किसन सोनवणे असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. चिंचोली गुरव येथील शेतकरी सुरेश किसन सोनवणे हे आपल्या २ बैलांसह जनावरांना चारा आणण्यासाठी बैलगाडी घेवून शेतात जात असताना रस्त्यावर तुटून पडलेल्या विद्युतवाहक तारेचा शॉक बसून दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला,

तर शेतकरी सुरेश सोनवणे हे या घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गावातीलच खाजगी एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. कामगार तलाठी यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. सदर दुर्घटनेतील शेतकऱ्यास शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी करण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts