Health Marathi News : केस (Hair) गळण्याची समस्या आजकाल जास्तीजास्त लोकांना आहेच. केस गळण्याचे थांबावे म्हणून अनेक जण खूप पर्याय वापरून पाहतात. पण केस गळण्याचे थांबत नाही. म्हणून या समस्येपासून सुटका हवी असेल तर या तेलाचा (Oil) वापर करा आणि केस गळण्यापासून मुक्त व्हा.
जर केस गळण्याने त्रस्त असाल किंवा तुमचे केस लांब करायचे असतील तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही तुमच्यासाठी मोहरीच्या तेलाचे फायदे (Advantages) घेऊन आलो आहोत.
या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मोहरीचे तेल (Mustard oil) मदत करू शकते. कारण मोहरीचे तेल फक्त स्वयंपाकातच वापरले जात नाही तर केस काळे, घट्ट आणि सुंदर बनवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.
मोहरीच्या तेलात पोषक घटक आढळतात
औषधी गुणधर्मांनी समृद्ध मोहरीचे तेल निर्जीव आणि पातळ केसांसाठी (Thin hair) सर्वात उपयुक्त आहे. मोहरीच्या तेलात लोह, जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के, मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात जे केसांचे पोषण करतात.
केसांसाठी मोहरीचे तेल का आणि कसे खास आहे
मोहरीच्या तेलाने केसांना मसाज केल्याने केसगळती कमी होते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. केसगळती आणि निर्जीव केस होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे टाळूमधील रक्ताभिसरण बिघडणे.
अशा वेळी मोहरीचे तेल लावल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते. याच्या वापराची पद्धत आणि जबरदस्त फायदे जाणून घेऊया.
मोहरीच्या तेलामुळे केसांना फायदा होतो
मोहरीचे तेल केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर आहे, जे केसांना जाड आणि निरोगी बनवते.
मोहरीच्या तेलाने केसांना मसाज केल्याने केस मऊ, रेशमी आणि दाट होतात.
केसांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने कोंडा दूर होतो.
त्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत, जे बॅक्टेरिया आणि बुरशीपासून टाळूचे संरक्षण करतात.
मोहरीच्या तेलात असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड, बीटा-कॅरोटीन, सेलेनियम केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात.
केसांना अशा प्रकारे मोहरीचे तेल वापरा
शॅम्पू करण्यापूर्वी हातावर थोडे मोहरीचे तेल घेऊन तळहातांमध्ये चोळा.
आता केसांच्या मुळापर्यंत कोमट तेल लावा.
या तेलाने केसांना काही वेळ मसाज करा.
त्यानंतर 1 तासानंतर केसांना शॅम्पू करा.
मोहरीचे तेल तुमचे केस मऊ आणि मजबूत बनवेल.