अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- राज्यात कोविड-१९चे निर्बंध हटवण्यासंदर्भात राज्य सरकारच्या टास्क फोर्स, आरोग्य विभाग व आपत्ती निवारण यंत्रणेसह सर्वांची मते प्राप्त झाली असल्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी दिले आहेत.
राज्य सरकारकडून सध्या कोरोनाच्या निर्बंधातून दिलासा मिळण्याबाबत नागरीकांना अपेक्षा असल्याबाबत आरोग्यमंत्र्याना विचारणा केली असता त्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
राज्यात करोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चे केल्यानंतर निर्बंध शिथिल करण्याबाबतचे आदेश काढण्यात येण्याची याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही निर्बंध शिथिल होण्याबाबत आदेश दिल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, राज्यातील करोना बाधितांची संख्या नियंत्रणात आहे. गेल्या दीड महिन्यांपासून ५ ते ७ हजारांच्या दरम्यान रुग्णसंख्या स्थिर आहे. करोनाबाधितांचा आकडा रोज खाली येत आहे. मात्र राज्यातील करोना रुग्णांची संख्या स्थिर ठेवण्यासाठी नागरिकांनी करोनाचे नियम पाळावे. तसेच, लसीकरणाला प्राधान्य द्या, असेही राजेश टोपें यानी म्हटले आहे.