अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- केस पातळ होणे किंवा केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे जी बर्याचदा लोकांना त्रास देते. स्त्रिया आणि पुरुषांमध्ये केस वेगवेगळ्या प्रकारमध्ये गळताना बघायला मिळते.
केस गळण्याची सर्वात सामान्य स्थिती म्हणजे एंड्रोजेनेटिक अलोपेसिया ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये केस गळतात. हे सामान्यत 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये दिसून येते.
यामागे वय हा एकच घटक नसून एका खाद्यपदार्थाचा केसांवर परिणाम होऊन ते पातळ होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे तरुणांमध्येही केसगळतीचा हा प्रकार पाहायला मिळत आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात – UK मधील प्रसिद्ध ट्रायकोलॉजिस्ट केविन मूर सांगतात की, जेवणात जास्त मीठ नक्कीच तुमच्या केसांच्या आरोग्याला खूप नुकसान पोहोचवते आणि त्यामुळे केस गळतात.
एका मुलाखतीत ते म्हणाले कि, जास्त मीठ खाल्ल्याने केसांच्या रोमांभोवती सोडियम तयार होतो, ज्यामुळे केसांतील फॉलिकलच्या ब्लड सर्कुलेशनवर परिणाम होतो. यामुळे आवश्यक पोषक केसांच्या कूपांमध्ये पोहोचत नाहीत.
तसेच पुढे मूर म्हणाले कि, जास्त प्रमाणात सोडियममुळे केस निर्जीव आणि कमकुवत होतात आणि हेच त्यांच्या गळतीचे कारण आहे. तसेच खूप कमी सोडियम देखील केसांच्या वाढीमध्ये समस्या निर्माण करू शकते.
खूप कमी मीठ खाल्ल्याने शरीरात आयोडीनची कमतरता निर्माण होते, जी थायरॉईडच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असते. थायरॉईड असंतुलित असेल तर तुमच्या केसांवरही परिणाम होतो. यामुळे केस निर्जीव आणि पातळ होतात. असेही ते म्हणाले आहे.
केस कसे मजबूत होतात – तज्ज्ञांच्या मते, केसांची ताकद तुमच्या आहारातील जीवनसत्त्वे आणि खनिजांवर अवलंबून असते. लोह आणि व्हिटॅमिन-बी 5 केस पातळ होण्यास प्रतिबंध करतात आणि टाळू निरोगी ठेवतात,
तर केसांची मजबूती आणि चमक यासाठी प्रोटीन आवश्यक असते. याशिवाय पर्यावरणीय समस्यांमुळे केसांचा दर्जा देखील खराब होतो, जे सामान्य आहे. काही लोकांमध्ये हे अनुवांशिक देखील आहे.
अतिरीक्त मीठ धोकादायक आहे – नसा आणि स्नायूंच्या योग्य कार्यासाठी शरीर मिठावर अवलंबून असते, परंतु त्याचा अतिरेक रक्तदाब वाढवतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.
NHS नुसार, प्रौढांनी दिवसातून 6 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. हे अंदाजे एक चमचे आहे, ज्यामध्ये 2.4 ग्रॅम सोडियम आहे. स्वयंपाक करताना किंवा खाताना काळजी घेऊन तुम्ही तुमच्या मिठाच्या सेवनाचा मागोवा घेऊ शकता.
या गोष्टींमध्ये जास्त मीठ असते – काही खाद्यपदार्थांमध्ये आधीपासून मीठ असते जसे की, टोमॅटो सॉस, पॅकेज केलेले पदार्थ, ब्रेड, तयार पदार्थ, पिझ्झा, सँडविच आणि सूपमध्ये आधीपासून काही प्रमाणात मीठ असते.
अशा परिस्थितीत तुम्ही काय खरेदी करत आहात याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. खरेदी करताना खाद्यपदार्थांची लेबल तपासा.