जोरदार कोसळलेल्या पावसाने नगर शहरातील इमारतीचा भाग कोसळला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- पावसाळा अद्याप सुरू झाला नाही. परंतु पावसाळ्यामध्ये अनेकदा जोरदार वारे व पावसाने इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात.

यामुळे मान्सूनपूर्वीच यांचे सर्वेक्षण होऊन संबंधिताना नोटीस पाठविण्याचे काम प्रशासनाचे असते. मात्र याकडे दुर्लक्ष झाले की दुर्घटना घडतातच. अशीच एक घटना नगर शहरात घडली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.

यातच नुकतेच वादळी वार्‍यासह जोरदार कोसळलेल्या पावसाने माणिक चौक येथील 96 वर्षीय जुन्या इमारतीचा एक भाग कोसळला. त्यामुळे इमारती लगत असलेल्या दोन दुकांनाचे नुकसान झाले आहे. मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वित्तहानी झाली आहे. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून शहरात होत असलेल्या पावसामुळे नगर शहरातील चितळे रोड, माळीवाडा, दिल्लीगेट, कापडबाजर, सावेडी, पाईपलाईन रोड, सावेडी, भिंगार, केडगाव भागात पावसाच्या चांगल्याच सरी बरसल्या. या पावसामुळे धोकादायक इमारतीचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe