WhatsApp Feature : WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठीआणखी एक जबरदस्त फीचर घेऊन येत आहे. वापरकर्तेही अनेक दिवसांपासून या फीचरची वाट पाहत होते.
या नवीन फीचरमुळे वापरकर्त्यांना आता चांगल्या दर्जाचे फोटो पाठवता येणार आहेत.परंतु, वापरकर्त्यांना या फीचरसाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
WABetaInfo नुसार, Android साठी WhatsApp चे नवीनतम बीटा अपडेट – 2.23.2.11 या अपडेटमुळे आता वापरकर्त्यांना फोटो पाठवण्याअगोदर त्यांची गुणवत्ता निवडण्याची परवानगी देते. या फीचरमुळे वापरकर्त्यांना उच्च रिझोल्यूशन किंवा मूळ गुणवत्तेमध्ये फोटो पाठवता येईल.
वापरकर्त्यांना मिळणार तीन फोटो क्वालिटी पर्याय
काही दिवसांपूर्वी बीटा आवृत्ती 2.21.15.7 मध्ये, WhatsApp वापरकर्त्यांना ऑटोमॅटिक, बेस्ट क्वालिटी आणि डेटा सेव्हर अशा तीन फोटो क्वालिटी पर्यायांना परवानगी देत असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे वापरकर्त्यांनी सर्वोत्तम दर्जाचा पर्याय निवडला तरीही, प्रतिमा निकृष्ट दर्जाच्या मिळत होत्या. तर दुसरीकडे, डेटा सेव्हर मोडने फोटो पूर्णपणे संकुचित केले.
असे करणार काम
नुकतेच आता बीटा एडिशनमध्ये, व्हॉट्सअॅपच्या शीर्षस्थानी एक सेटिंग बटण दिसले आहे, ज्यावर तुम्ही टॅप करून तुम्ही फोटोची गुणवत्ता निवडू शकता. त्यामुळे आता वापरकर्त्यांना याद्वारे मूळ दर्जाचे फोटो पाठवता येतील.
अनेक दिवसांपासून वापरकर्त्यांना या वैशिष्ट्याची प्रतीक्षा होती कारण प्रत्येक वेळी एखाद्याला मूळ-गुणवत्तेचा फोटोची गरज असताना, त्यांना तो दस्तऐवजाद्वारे पाठवावा लागत असे.
iOS वापरकर्त्यांसाठी ही प्रक्रिया खूप किचकट होती कारण त्यांना प्रथम फाइल्स अॅपमध्ये दस्तऐवज म्हणून प्रतिमा जतन कराव्या लागत होत्या आणि नंतर दस्तऐवज आवृत्ती पाठवावी लागत होती.
हे नवीन फीचर टेलिग्रामशी स्पर्धा करेल. परंतु, वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅप हे फीचर केव्हा आणेल हे स्पष्ट नाही कारण ते बीटा आवृत्तीमध्ये दिसले होते.
तसेच व्हॉट्सअॅप व्हॉइस स्टेटस फीचरची चाचणी करत असून ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या स्वतःच्या व्हॉइस नोट्स रेकॉर्ड करता येईल. यामुळे टायपिंगच्या विरूद्ध काही वेळ वाचू शकतो.
परंतु उपयुक्तता प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते. WhatsApp चाचणी करत असलेल्या इतर वैशिष्ट्यांमध्ये कॅमेरा मोड, प्रॉक्सी, ब्लॉक शॉर्टकट आणि बरेच काही समाविष्ट आहे.