Hero Electric Optima CX : बाजारात आता मागणीमुळे वेगवेगळ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कुटर्स लाँच होऊ लागल्या आहेत. ज्यांच्या किमती वेगवगेळ्या आहेत आणि फीचर्सही. ग्राहक जास्त रेंज देणारी स्कुटर खरेदी करतात. बाजारात Hero Electric Optima CX स्कुटर उपलब्ध आहे. जी तुम्ही स्वस्तात विकत घेऊ शकता.
दोन बॅटरी पर्याय
आरामदायी राइडसाठी Hero Electric Optima CX मध्ये समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागे ड्युअल शॉक एब्जॉर्बर दिले आहेत. माहितीनुसार, ही स्कूटर दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध असून मार्केटमध्ये या स्कूटरचे सिटी स्पीड (HX) आणि कम्फर्ट स्पीड (LX) असे दोन प्रकार मिळत आहेत.
ड्रम ब्रेक
तसेच Hero Electric Optima CX मध्ये, सिंगल बॅटरी व्हेरिएंट 82 किमीची ड्रायव्हिंग रेंज मिळत आहे. इतकेच नाही तर दोन बॅटरी व्हर्जन 122 किमीची ड्रायव्हिंग रेंज देत असून सुरक्षेसाठी स्कूटरच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत. कंपनीची ही हाय परफॉर्मन्स स्कूटर असून ही स्कूटर 67,329 हजार रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल.
आठ रंग पर्याय
Hero Electric Optima CX मध्ये आठ आकर्षक रंगांचे पर्याय दिले आहेत. या स्कूटरचे एकूण वजन 72.5 किलो असल्याने रस्त्यावर नियंत्रण करणे खूप सोपे होते. स्कूटर केवळ 5 तासात पूर्ण चार्ज होत असून यात फास्ट चार्जरने चार्ज करण्याचा पर्याय दिला आहे.
ब्रेकिंग सिस्टम
Hero ची ही डॅशिंग स्कूटर 4 ते 5 तासांत पूर्ण चार्ज होते आणि त्याची शक्ती 550 W इतकी आहे. ते 1,200 W ची कमाल उर्जा निर्माण करते. तसेच सुरक्षेसाठी स्कूटरला एकत्रित ब्रेकिंग सिस्टीम दिली आहे. जे अचानक टायर घसरणे, ब्रेक मारणे किंवा रस्ता अपघाताच्या वेळी दोन्ही चाकांवर नियंत्रण ठेवते.
किंमत
किमतीचा विचार केलेला तर Hero Electric Optima CX चे टॉप व्हेरियंट Rs 1.30 लाख एक्स-शोरूममध्ये खरेदी करता येईल. या स्कूटरचा ग्राउंड क्लीयरन्स 140 मिमी असून ती लहान ठिकाणाहून वळवण्यात कसली अडचण येणार नाही. या स्कूटरमध्ये ओडोमीटर आणि डिजिटल टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच बाजारात ही स्कूटर TVS X EV, Gleev Motors Protos, LML Star, आणि Suzuki Burgman Electric शी टक्कर देते.