Hero Electric Scooter : अवघ्या 10 हजारात खरेदी करा 85KM रेंज देणारी हिरोची ‘ही’ स्कुटर, जाणून घ्या

Hero Electric Scooter : बाजारात अनेक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होऊ लागल्या आहेत. मागणी जास्त असल्याने या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती खूप जास्त आहेत. अनेकांचे बजेट कमी असते त्यामुळे त्यांना इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करता येत नाही.

जर तुम्ही नवीन स्कुटर खरेदी करण्याच्या तयारीत असाल आणि तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. आता तुम्ही अवघ्या 10 हजार रुपयांमध्ये हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. तुम्ही आता Hero Electric च्या Atria LX आणि Flash LX या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. ज्यात शानदार फीचर्स आहेत. एकच चार्जवर ती 85 किलोमीटर धावेल.

हिरो इलेक्ट्रिक स्कूटर atria lx

किमतीचा विचार केला तर Hero Electric Atria LX ची ​​एक्स-शोरूम किंमत 77690 रुपये इतकी आहे. त्याची बॅटरी एका पूर्ण चार्जमध्ये 85 किमी असून त्याचा टॉप स्पीड खूपच कमी आहे. एकंदरीतच २५ किमी प्रतितास पर्यंत.

समजा तुम्ही या मॉडेलला 10,000 रुपयांच्या डाउनपेमेंटसह फायनान्स केले तर तुम्हाला सहज 67690 रुपयांचे कर्ज मिळेल. कर्ज परतफेडीचा कालावधी 2 वर्षांचा असल्यास ज्यावर तुम्हाला 9% दराने व्याज द्यावे लागणार आहे. या गणनेसह, तुम्हाला पुढील 24 महिन्यांसाठी 3092 रुपये EMI म्हणून भरावे लागणार आहे.

हिरो इलेक्ट्रिक स्कूटर फ्लॅश lx

किमतीचा विचार केला तर Flash LX ची ​​एक्स-शोरूम किंमत 59640 रुपये इतके आहे. हे एका चार्जवर 25 किलोमीटर प्रति तास या वेगाने 85 किलोमीटरपर्यंत चालवता येईल. जर तुम्हाला 10000 रुपयांच्या डाऊनपेमेंटनंतर Flash LX फायनान्स मिळत असेल तर तुम्हाला 49640 रुपये कर्ज मिळणार आहे. कर्जाचा कालावधी 2 वर्षांचा असल्यास आणि व्याजदर समान 9% असणार आहे. अशाप्रकारे, तुम्हाला पुढील दोन वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 2268 रुपये मासिक EMI भरावे लागणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts