Hero Upcoming Bike : तुम्ही नवीन बाईक खरेदी करताय का? जर नवीन बाईक खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण भारतीय बाजारात लवकरच हिरोची नवीन बाईक लाँच होणार आहे. लाँच झाल्यानंतर ही बाईक मार्केटमधील इतर बाईक्सना जोरदार टक्कर देऊ शकते.
हिरोच्या अनेक बाईक्स मार्केटमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. अशातच आता ही कंपनी आपली नवीन पॅशन प्लस 100cc बाईक घेऊन येत आहे. कंपनी यात 60+ kmpl चे मायलेज देण्याची शक्यता आहे. तसेच या बाईकची किंमतही खूपच कमी असणार आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी, स्प्लेंडरशी स्पर्धा करण्यासाठी Honda कडून नवीन 100cc Honda Shine बाईक लाँच करण्यात आली होती. आता याच बाइकला टक्कर देण्यासाठी Hero आता Passion Plus 100cc बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीची आगामी बाईक 60KM पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते.
जाणून घ्या बाईकची खासियत
या बाईकमध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्क्वेरिश एलसीडी डिस्प्ले आणि मोबाइल चार्जिंग पोर्टसह अॅनालॉग स्पीडोमीटर असणार आहे. डिस्प्ले ओडोमीटर रीडिंग, ट्रिप मीटर, इंधन गेज तसेच इतर अनेक माहिती दर्शवेल. पॅशन प्लस स्प्लेंडर प्रमाणेच यात 97.2cc इंजिनद्वारे समर्थित असणार आहे, जे 7.91 bhp आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करेल. या बाईकच्या इंजिनला 4-स्पीड गिअरबॉक्स देण्यात येणार आहे.
इतकंच नाही तर हिरोचे i3S स्टॉप-स्टार्ट तंत्रज्ञानही दिले जाणार आहे. बाईक 60+ kmpl चे मायलेज देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंस्ट्रुमेंटेशन आणि वैशिष्ट्यांची यादी मानक पॅशन 110 सारखीच असेल.