अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूर आणि दरडी कोसळल्याने या भागा तील नागरिकांच्या मदतीला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे धावले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून आपत्तीग्रस्त भागात ते नागरिकांची भेट घेवून त्यांना आधार दिल. तसेच अत्यावश्यक वस्तूंचे वाट प केले.राज्यात ज्या-ज्या वेळी संकटाची परिस्थिती निर्माण झाली, त्या प्रत्येक वेळी आमदार पवार हे मदतीला धावून गेले आहेत. कोरोनाच्या काळातही त्यांनी मदत केल्याचे दिसून आले.
त्याच धर्तीवर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील संकटातही त्यांनी ‘कर्जत जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’,’बारामती ॲग्रो’ आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून आवश्यक साहित्याची मदत केली. रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर,
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, सातारा जिल्ह्यातील पाटण तसेच कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्त नागरिकांना स्वत: जाऊन ही मदत तेथील प्रशासनाकडे सुपूर्द केली.
पूरग्रस्त भागातील भेटीवेळी कोल्हापूरकरांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचे सांगिलते. याची दखल घेत तातडीने पिण्याच्या पाण्याचे १० टँकर कोल्हापूरकरांसाठी पाठवून दिले.