ताज्या बातम्या

High cholesterol : उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी लसणाचे दूध वरदान, जाणून घ्या कसे?

Garlic Milk Benefits To Reduce Cholesterol : खराब जीवनशैलीमुळे सध्या कोलेस्टेरॉलची समस्या अनेकांमध्ये वाढत आहे. अशावेळी योग्य आहार घेणे फार महत्वाचे आहे. कोलेस्टेरॉल अनेक कारणांमुळे होतो, कोलेस्टेरॉलमुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच त्याकडे विशेष लक्ष देणे फार गरजेचे आहे.

अशा परिस्थितीत आता  प्रश्न असा येतो की जर एखाद्या व्यक्तीला उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर कोणत्या प्रकारचा आहार घेणे आवश्यक आहे? जर तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर लसूण दूध तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. हे बनवणे देखील खूप सोपे आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसणाचे दूध पिण्याचे फायदे :-

-लसणाचे दूध प्यायल्याने नसामध्ये जमा होणारे वाईट कोलेस्ट्रॉल (LDL Cholesterol) कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL Cholesterol) वाढते. अशा प्रकारे ते उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करते. याचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा झटका, निकामी होणे, स्ट्रोक, हार्ट ब्लॉकेज इत्यादी परिस्थितींचा धोका कमी होण्यास मदत होते.

लसूण दूध बनवण्याची पद्धत

चहाच्या पातेल्यात १०० मिली दूध टाकून गॅसवर ठेवा. आता 10 ग्रॅम ताज्या लसणाच्या पाकळ्या ठेचून त्याची पेस्ट घाला. शेवटी 100 मिली पाणी घालून हे मिश्रण अर्धे होईपर्यंत उकळवा. ते गाळून कप किंवा ग्लासमध्ये काढा.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण दूध पिण्याची पद्धत

जर एखाद्या व्यक्तीला उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तो दिवसातून एक वेळा लसणाचे दूध पिऊ शकता. सामान्यतः असा सल्ला दिला जातो की, तुम्ही ते अन्नापासून वेगळे घ्यावे. म्हणून, ते सेवन करण्यापूर्वी आणि नंतर काही काळ काहीही न खाण्याचा प्रयत्न करा. सकाळी 11 किंवा 4 वाजेपर्यंत ते पिण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानली जाते. यावेळी तुम्ही 100 मिली लसूण दूध पिऊ शकता.

टीप : दीर्घकाळापर्यंत सतत लसणाचे दूध पिणे टाळा. या दरम्यान थोडा वेळ अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. एक आठवडा सतत प्या आणि नंतर एक आठवडा ब्रेक घ्या. याशिवाय त्याचे सेवन सुरू करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Renuka Pawar

Recent Posts