High Court : दिल्ली हायकोर्टासमोर (Delhi High Court) एक केस आली आहे, ज्यामध्ये एका घरातून एकूण 132 दारूच्या बाटल्या (132 liquor bottles) सापडल्या आहेत.
त्यात 51.8 लिटर व्हिस्की (whiskey), जिन (gin) , रम (rum), वोडका (vodka) होते. तर घरात 55.4 लिटर बिअर (beer) सापडली. तुम्हाला माहित आहे का की कायदेशीररीत्या देशातील प्रत्येक व्यक्तीला मर्यादित प्रमाणात मद्यपान (alcohol
) करता येते. मात्र प्रमाणापेक्षा जास्त दारू बाळगल्याबद्दल तुमच्यावर कारवाई होऊ शकते.दिल्ली उच्च न्यायालयात दिलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, 25 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती ठराविक प्रमाणात दारू ठेवू शकते. 25 वर्षांच्या व्यक्तीकडे 9 लिटर व्हिस्की, जिन, रम आणि वोडका असू शकतात. त्याच वेळी, एक व्यक्ती 18 लिटर बिअर ठेवू शकते. यासोबतच एखादी व्यक्ती 18 लिटरपर्यंत वाइन आणि अल्कोहोल ठेवू शकते.
प्रकरण काय होते?
दिल्ली हायकोर्टात एका घरातून एकूण 132 दारूच्या बाटल्या सापडल्याचं प्रकरण समोर आलं आहे. त्यात 51.8 लिटर व्हिस्की, जिन, रम, वोडका होते. तर घरात 55.4 लिटर बिअर सापडली.
ज्या कुटुंबात दारू सापडली ते संयुक्त कुटुंब होते ज्यात 6 पेक्षा जास्त लोक 25 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. दिल्ली उत्पादन शुल्क कायद्याच्या नियमांनुसार, एकूण लोकसंख्येनुसार दारूचे प्रमाण नियमांचे उल्लंघन नाही. हे प्रकरण 2009 चे आहे.
पोलिसांनी छापा टाकला होता
या घरावर छापा टाकून पोलिसांनी या दारूच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. परंतु, न्यायालयात प्रकरण समोर आल्यानंतर हा एफआयआर (FIR) रद्द करण्यात आला. यासोबतच आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यास त्यांनी नकार दिला.
2009 मध्ये काही गुप्त माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) या कुटुंबाच्या घरावर छापा टाकला होता.
या छाप्यात पोलिसांनी दिल्लीतील या घरात अवैधरित्या दारूच्या बाटल्या ठेवल्याचा आरोप केला होता. या घरातून देशी-विदेशी ब्रँडच्या (foreign brands) एकूण 132 बाटल्या पोलिसांना सापडल्या.