ताज्या बातम्या

दारू विक्रेत्यांना दणका, या गावातील दारूबंदी कोर्टाकडून वैध

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील निघोज येथे ६ वर्षांपूर्वी झालेली दारूबंदी कायदेशीरच असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

निघोज येथे महिलांच्या ऐतिहासिक लढ्यानंतर मतदानातून बहुमताने दारुबंदी करण्यात आली होती.महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या निघोज येथे पुन्हा दारूबंदी जाहीर केल्याच्या निर्णयाला येथील दारू विक्रेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देवून राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती.

या याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर घेण्यात आली.न्यायालयाने यावेळी राज्य उत्पादनशुल्क आयुक्त यांनी निघोजला पुन्हा दारूबंदी केल्याचा निर्णय योग्य असण्यावर शिक्कामोर्तब केले.

राज्य उत्पादनशुल्क आयुक्त यांनी निघोजला पुन्हा दारूबंदीचा घेतलेला निर्णय योग्य असून त्यात हायकोर्ट हस्तक्षेप करू इच्छित नाही असे म्हणत दारूविक्रेत्यांची याचिका निकाली काढली. दारूबंदीसाठी ऐतिहासिक लढा देणाऱ्या महिलांचा हायकोर्टाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा विजय झाला आहे. येथे आता कायदेशीर दारूबंदी झाली आहे

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts