Home Loan Interest Rate: मागच्या महिन्यात आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केली होती त्यानंतर देशातील बहुतेक बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे कर्ज आणि EMI महाग झाले आहे.
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो कि आरबीआयने आता पर्यंत रेपो दरात 190 bps ने वाढ केली आहे. या महागाईत तुम्ही देखील आता गृहकर्ज घेण्याचा विचार करत असले तर आज आम्ही तुम्हाला काही बँकेबद्दल माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कमी व्याजदरात होम लोन मिळेल.
HDFC Home Loan Interest Rate 2022
एचडीएफसी बँकेच्या गृहकर्जाचा दर महिलांसाठी 8.6 टक्के आणि इतरांसाठी 8.65 टक्के आहे. 30 लाखांपर्यंतच्या कर्जाचा व्याजदर 9.1 टक्क्यांपर्यंत आहे. 30 लाख ते 75 लाख रुपयांच्या गृहकर्जाचा व्याजदर 8.85 टक्क्यांपासून 9.40 टक्क्यांपर्यंत आहे.
PNB Home Loan Interest Rate 2022
पंजाब नॅशनल बँक (PNB) क्रेडिट स्कोअर, प्रोफाइल आणि गृहकर्जाच्या प्रकारानुसार 8.20 टक्के ते 9.35 टक्के दरम्यान विविध व्याजदर ऑफर करते. 30 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 8.2 टक्के व्याजदर आहे. यामध्ये, RLLR आणि BSP जोडल्यानंतर ते 8.65 टक्के होते.
SBI Home Loan Interest Rate 2022
स्टेट बँक ऑफ इंडिया अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून वेगवेगळे गृहकर्ज व्याजदर देते. गृहकर्जाचे व्याजदर 8.4 टक्क्यांपासून सुरू होऊन 9.05 टक्क्यांपर्यंत जातात.
ICICI Home Loan Interest Rate 2022
SBI प्रमाणे, ICICI बँक देखील अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून वेगवेगळे व्याज दर ऑफर करते. Busik गृह कर्जाचा व्याजदर 8.4 टक्के आहे. कर्जदाराच्या प्रोफाइलनुसार ते 9.5 टक्क्यांपर्यंत जाते.
हे पण वाचा :- Post Office: पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! ‘त्या’ नियमात झाला मोठा बदल ; आता ..