Home Loan : गृहकर्जातून सुटका पाहिजे असेल तर करा ‘हे’ काम, होईल लाखोंची बचत

Home Loan : अनेकजण गृहकर्ज घेतात, परंतु त्यांना ते वेळेत पूर्ण करता येत नाही. त्यामुळे त्यांचा वेळही वाया जातोच आणि त्यांना जास्त पैसे भरावे लागतात. परंतु तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला लाखोंची बचत करता येईल. तसेच तुमची वेळेपूर्वी गृहकर्जातून सुटका होईल.

समजा तुम्ही वेळ कमी केलात, तर तुमचा खूप पैसा तर वाचेल आणि तुमची कर्जातून लवकरात लवकर सुटका होऊ शकते. हे लक्षात घ्या की सध्या, गृहकर्जाचे व्याजदर खूप जास्त असून त्यामुळे त्याचा ईएमआयदेखील खूप जास्त आहे. त्यामुळे त्याची परतफेड लवकरात लवकर करणे तुमच्यासाठी फायदेशीर होईल.

जाणून घ्या सूत्र

समजा तुम्हाला कर्जाची लवकर परतफेड करायची असल्यास तसेच व्याजात पैसे वाचवायचे असतील तर तुम्हाला फक्त एक गोष्ट करावी लागणार आहे. तुम्ही प्रत्येक वर्षी आणखी एक EMI भरला आणि प्रत्येक वर्षी तुमच्या EMI मध्ये 7.5% अधिक जोडला तर, तुमचे 25 वर्षांचे गृहकर्ज केवळ 10 वर्षांत पूर्ण होईल. या सूत्रानुसार पुढे गेला तर तुम्हाला जास्त ओझे सहन करावे लागणार नाही आणि तुमची खूप बचत होईल.

किती कर्ज सहन करावे लागेल?

समजा तुम्ही ८.५ टक्के व्याजाने ५० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले घेतल्यास तर तुम्हाला ते २५ वर्षांत परत करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत तुमचा EMI प्रत्येक महिन्याला ४०,२६१ रुपये असणार आहे. समजा तुम्ही कोणतेही अतिरिक्त पेमेंट केले नाही तर ते परत करण्यासाठी 25 वर्षे लागू शकतात. इतकेच नाही तर या काळात तुम्हाला ५० लाख रुपयांच्या कर्जावर ७० ते ७१ लाख रुपये व्याजही द्यावे लागू शकते. एकंदरीतच तुम्ही 50 लाख रुपये घ्याल आणि त्यासाठी तुम्हाला 1.20 कोटी रुपये द्यावे लागतील.

अतिरिक्त EMI

अतिरिक्त EMI म्हणजे प्रत्येक वर्षी 12 EMI भरण्याऐवजी, तुम्ही 13 EMI देऊ शकता. प्रत्येक वर्षी केवळ 40,261 रुपये जास्त भरून तुम्हाला खूप फायदा होईल. फक्त ही एक गोष्ट केली तर तुम्ही 19-20 वर्षात संपूर्ण कर्जाची परतफेड करू शकता. कर्जाची मुदत 5 वर्षापूर्वी संपू शकते.या 25 वर्षांत तुम्हाला अतिरिक्त EMI म्हणून 10,06,525 रुपये जास्त द्याल आणि थेट व्याजात 18 रुपये वाचवू शकता. समजा तुम्हाला 40 हजार रुपयांचा EMI एकरकमी भरणे अवघड असेल, प्रत्येक महिन्याला 3 ते 4 हजार रुपये जास्त भरा, जेणेकरून हे पैसे एका वर्षात EMI सारखे होतील.

ईएमआयमध्ये 7.5 टक्क्यांची वाढ केली तर?

समजा तुम्ही दुसऱ्या EMI रक्कम प्रत्येक वर्षी ७.५ टक्क्यांनी वाढवली तर त्याचा फायदा तुम्हाला होईल. समजा तुम्ही तुमचा EMI प्रत्येक वर्षी केवळ 5 टक्के (रु. 2,013) वाढवलात, तर तुमचे कर्ज अवघ्या 14 वर्षात फेडले जाऊ शकते. इतकेच नाही तर जर तुम्ही ईएमआय 7.5 टक्क्यांनी (3,019 रुपये) वाढवलात तर तुमचे कर्ज फक्त 12 वर्षांत संपू शकतो.

..तर लागेल लॉटरी

समजा तुम्ही प्रत्येक वर्षी एक EMI अतिरिक्त भरला आणि EMI 7.5% ने वाढवला, तर 25 वर्षांचे गृहकर्ज केवळ 10 वर्षांत संपेल. ईएमआय वाढवण्यासाठी पैसे तुमच्या पगारवाढीतून किंवा तुमच्या गुंतवणुकीतील व्याजातून मिळतील. तुम्ही 10 वर्षात कर्जाची परतफेड तर करू शकताच, परंतु व्याजाच्या स्वरूपात एकूण 30 लाख रुपयांची बचत होईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts