Honda Brio : भारतीय बाजारात अनेक दिग्ग्ज कंपन्या आपल्या नवनवीन कार लाँच करत असतात. वेगवेगळ्या फीचर्समुळे अनेक कंपन्यांच्या कारमध्ये टक्कर आपल्याला पाहायला मिळते. अशातच आता कार खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
कारण शानदार फीचर्ससह Honda Brio चे नवीन व्हर्जन लॉन्च झाले आहे. परंतु जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण ही कार अजूनही भारतात लाँच झाली नाही, कंपनीची ही कार इंडोनेशियामध्ये लाँच झाली आहे.
आगामी कार दोन ट्रिम आणि पाच प्रकारात खरेदी करता येणार
कंपनीची आगामी कार तुम्हाला दोन ट्रिम्स आणि पाच प्रकारात खरेदी करता येणार आहे. ग्राहकांसाठी ही कार मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध असणार आहे. लवकरच ती भारतीय बाजारपेठेत सादर केली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. कंपनीकडून आगामी कार लाइम मेटॅलिक, क्रिस्टल ब्लॅक, मेटोराइट ग्रे, पर्ल टू टोन आणि स्टेलर डायमंड पर्ल कलर अशा कलर पर्यायात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
मिळणार शानदार फीचर्स
कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीकडून त्याचे फ्रंट ग्रिल पूर्वीपेक्षा मोठे करण्यात आले आहे. या कारच्या टॉप-स्पेसमध्ये एलईडी हेडलाइट्स, एलईडी फॉग लाइट्स, रिक्वेस्ट सेन्सर्स तुम्हाला मिळणार आहेत. त्याची क्षैतिज पट्टी पूर्वीपेक्षा लहान केली आहे. आगामी कारमध्ये एलईडी सिग्नेचर लाइटिंग. यात 15-इंच अलॉय व्हील, इन्स्ट्रुमेंट कन्सोल, पुश-बटण स्टार्ट, एलईडी इंडिकेटरसह ORVM, स्मार्टफोन इंटिग्रेशनसह 7-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन यांसारखी शानदार फिचर यात पाहायला मिळणार आहे.